coronavirus update: Akola: एकूण पॉझिटीव्ह- 762; बारा जणांच्या मृत्यूची नोंद, 539 जणांना डिस्चार्ज

             *कोरोना अलर्ट*
                                       file photo

*आज रविवार दि. 9 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-2294*
*पॉझिटीव्ह-550*
*निगेटीव्ह-1744*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 550+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 212= एकूण पॉझिटीव्ह- 762



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 550 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 280 महिला व 270 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-61, अकोट-102, बाळापूर-27, तेल्हारा-13, बार्शी टाकळी-38, पातूर-37, अकोला-272. (अकोला ग्रामीण-52, अकोला मनपा क्षेत्र-220)



आज दिवसभरात 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पातूर येथील 70 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर नाका येथील 24 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 29 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, जीएमसी क्वॉटर येथील 69 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 2 मे रोजी दाखल करण्यात आले होते,  अकोट येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर डोंगरगाव येथील 69 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते. कौलखेड येथील 58 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते. खदान येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, कवसा ता.अकोट येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 8 रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, कामखेड ता.पातूर येथील 61 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. हा रुग्ण मलकापूर येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 21 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील चार, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, देवसार हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, समाज कल्याण वसतीगृह येथील आठ, केअर हॉस्पीटल येथील दोन, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील 450 असे एकूण 539 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-35036+10587+177= 45800*
*मयत-799*
*डिस्चार्ज-38437*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6564*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या