Coronavirus in India: द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीची आवश्यकता वाढली; धोकादायक मालवाहतुकीसाठी तातडीने मोठ्या संख्येने प्रशिक्षित चालक तयार करण्याची गरज

                                संग्रहित छायाचित्र 




नवी दिल्ली :सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीच्या काळात देशातील विविध भागात द्रवरूप ऑक्सिजनच्या (एलओएक्स) जलद आणि सुरळीत वाहतुकीवर  प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या नियमांनुसार आणि सीएमव्हीआर, 1989 च्या अनुषंगाने पुरेसे प्रशिक्षण असलेले आणि धोकादायक मालवाहतुकीचा परवाना असलेल्याच प्रशिक्षित चालकांना द्रवरूप ऑक्सिजनचे ट्रक चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 24x7 मागणी लक्षात घेऊन विद्यमान चालकांना पूरक व त्यांच्या जागी नवीन चालकांना सामावून घेण्यासाठी तातडीने मोठ्या संख्येने प्रशिक्षित चालक तयार करण्याची आवश्यकता आहे.




या संदर्भात मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोठ्या संख्येने प्रशिक्षित वाहनचालक तयार करण्याची आणि असे 500 प्रशिक्षित चालक त्वरित उपलब्ध करुन देण्याची आणि पुढील दोन महिन्यांत अशा वाहनचालकांची संख्या 2500 पर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे


*अतिरिक्त प्रशिक्षित वाहनचालक  तयार करण्यासाठी अवलंबल्या जाणार्‍या धोरणाचा भाग म्हणून यासंदर्भात मंत्रालयाने सूचना देखील केल्या आहेत


*अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे धोकादायक रसायने आणि एलएमओ हाताळणीचे प्रशिक्षण देऊन  त्वरित कुशल चालक तयार करणे.


*अल्प कालावधीच्या (3/4 दिवस) प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे  धोकादायक रसायने आणि एलएमओ हाताळण्यासाठी एचएमव्ही परवानाधारकांना कौशल्य प्रशिक्षण देणे


*लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिल (एलएसएससी), इंडियन केमिकल कौन्सिल (आयसीसी), नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) आणि मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांच्या मदतीने ही प्रशिक्षण मॉड्यूल तयार केली आहेत.


*राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी एचएमव्ही/धोकादायक रसायने वाहतूक परवाना असलेल्या काही स्थानिक चालकांची शिफारस करण्याची विनंती केली गेली आहे.


* सर्व कुशल चालकांची यादी डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध केली जावी आणि या प्रशिक्षित चालकांच्या सेवेचा वापर क्रायोजेनिक एलएमओ टँकर्सच्या वाहतुकीसाठी करण्यात यावा.


*द्रवरूप ऑक्सिजन टँकर चालकांना विशेष कोविड लसीकरण मोहीम अंतर्गत लस देण्यात यावी तसेच त्यांना कोविडची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि उपचारांसाठी प्राधान्य दिले जावे.

टिप्पण्या