corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह- ६८०; अकरा जणांच्या मृत्यूची नोंद, ४५९ जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ६ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२७१७*
*पॉझिटीव्ह-५०८*
*निगेटीव्ह-२२०९*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५०८+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १७२= एकूण पॉझिटीव्ह- ६८०



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ५०८ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २०४ महिला व ३०४ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-५९, अकोट-११, बाळापूर-५०, तेल्हारा-२८, बार्शी टाकळी-२६, पातूर-४४, अकोला-२९०. (अकोला ग्रामीण-७५, अकोला मनपा क्षेत्र-२१५)




आज दिवसभरात ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २२ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पातूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. ५ मे रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते, तर निंबी ता.बार्शीटाकळी येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, बाबुळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते. सौदांळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते.  रामटेकपूर ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. कोथाली खु. ता.बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ रोजी दाखल करण्यात आले होते, तर कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ५ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, मुंडगाव ता.अकोट येथील ३० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील सहा, उसाई हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, सहारा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, होले हॉस्पीटल येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ३९० असे एकूण ४५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३३५७६+१००४८+१७७= ४३८०१*
*मयत-७५४*
*डिस्चार्ज-३६८६०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६१८७*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या