corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह रुग्ण-७१८; सहा जणांच्या मृत्यूची नोंद, ४७५ जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*



*आज मंगळवार दि. ४ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २२७९*
*पॉझिटीव्ह-४८४*
*निगेटीव्ह-१७९५*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ४८४+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी २३४= एकूण पॉझिटीव्ह-७१८



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ४८४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १९८ महिला व २८६ पुरुषांचा समावेश आहे. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-४८, अकोट-६२, बाळापूर-३०, तेल्हारा-३५, बार्शी टाकळी-२९, पातूर-तीन, अकोला-२७७. (अकोला ग्रामीण-६६, अकोला मनपा क्षेत्र-२११)



आज दिवसभरात सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १ रोजी दाखल करण्यात आले होते, बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते, पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर लहान उमरी  येथील ७५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २ रोजी दाखल करण्यात आले होते, वनी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३६, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इनफिनिटी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, फातीया हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, लोहाणा हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी तीन, केअर हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील ३८० असे एकूण ४७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३२५७९+९६७१+१७७= ४२४२७*
*मयत-७३७*
*डिस्चार्ज-३५९९८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५६९२*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या