corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह- ५६३; तेरा जणांच्या मृत्यूची नोंद, ४७० जणांना डिस्चार्ज

                 *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १ मे २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१७३३*
*पॉझिटीव्ह-३६८*
*निगेटीव्ह-१३६५*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३६८+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १९५= एकूण पॉझिटीव्ह- ५६३



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ३६८ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५८ महिला व २१० पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-१९, अकोट-५१, बाळापूर-३४, तेल्हारा-सात, बार्शी टाकळी-१५, पातूर-दोन, अकोला-२४०. (अकोला ग्रामीण-३३, अकोला मनपा क्षेत्र-२०७)

आज दिवसभरात १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात न्यु राधाकिसन प्लॉट येथील ४५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य पंचशील नगर येथील ५४ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, बार्शीटाकळी येथील ७३ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, मेहरे नगर येथील ३५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, तर व्हिएचबी कॉलनी येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, बेलुर ता. अकोट येथील ७१ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अजनी ता. बार्शीटाकळी येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच अकोलखेड ता.अकोट येथील ९० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, पिंपळगाव ता.बाळापूर येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अकोली जहागीर ता. अकोट येथील ५० वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, वरुड ता. तेल्हारा येथील ३९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते, तर नवेगाव छान्नी ता. पातूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १३, आधार हॉस्पीटल येथील तीन, केअर हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एक, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर पास्टूल येथील १०, के.एस.पाटील हॉस्पीटल येथील तीन, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, फतेमॉ हॉस्पीटल येथील दोन, अकोल ॲक्सीडेंट येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, इनफिनीटी हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील  दोन, सहारा हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३८५ असे एकूण ४७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३१४६३+९०८३+१७७= ४०७२३*
*मयत-७०२*
*डिस्चार्ज-३४६३९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-५३८२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या