corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-756; चौदा जणांच्या मृत्यूची नोंद, 845 जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*


*आज गुरुवार दि. 13 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-2517*
*पॉझिटीव्ह-561*
*निगेटीव्ह-1956*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 561+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 195= एकूण पॉझिटीव्ह-756



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 561 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 245 महिला व 316 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-44, अकोट-24, बाळापूर-63, तेल्हारा-110, बार्शी टाकळी-34, पातूर-76, अकोला-210. (अकोला ग्रामीण-56, अकोला मनपा क्षेत्र-154)



आज दिवसभरात 14 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खेतान नगर येथील 76 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 3 मे रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य दहिहांडा ता. अकोट येथील 75 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, किनखेड ता. अकोट येथील 71 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, घोडेगाव ता. तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते. पातूर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, तर काळेगाव ता. तेल्हारा येथील 82 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते.  राजंदा ता. बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, शिवर येथील 64 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, गोरेगाव येथील 39 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 11  रोजी दाखल करण्यात आले होते, डाबकी रोड येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 4 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, निराट वैऱ्हाट येथील पुरुष रुग्णास दि. 8 मे रोजी दाखल करण्यात आले होते, न्यु तापडीया नगर येथील 83 वर्षीय महिलाअसून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते, अकोट येथील 34 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 68 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 8 रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 37, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, देवसर हॉस्पीटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील एक, गोयका हॉस्पीटल येथील आठ, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल येथील नऊ, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील 10, मुलाचे वसतीगृह मुर्तिजापूर येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, समाज कल्याण वसतीगृह येथील पाच, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, सोनोने हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 728 असे एकूण 845 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-36993+11383+177= 48553*
*मयत-851*
*डिस्चार्ज-40993*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6709*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या