corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-654; दहा जणांच्या मृत्यूची नोंद, 552 जणांना डिस्चार्ज

               *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. 11 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- 1858*
*पॉझिटीव्ह-413*
*निगेटीव्ह-1445*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 413+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 241= एकूण पॉझिटीव्ह-654



*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 413 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 172 महिला व 241 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-59, अकोट-नऊ, बाळापूर-51, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-29, पातूर-50, अकोला-210. (अकोला ग्रामीण-40, अकोला मनपा क्षेत्र-170)



आज दिवसभरात 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात रेणूका नगर येथील 41 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य वाडेगाव ता. बाळापूर येथील 45 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 7 मे रोजी दाखल करण्यात आले होते, बोरगाव मंजू येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. 7 रोजी दाखल करण्यात आले होते, अन्वी मिर्झापूर येथील 80 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल करण्यात आले होते. पिकेव्ही क्वॉटर  येथील 51 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 मे रोजी दाखल करण्यात आले होते, तर  पिंपरी खुर्द येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर  डाबकी रोड येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर येथील 72 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 6 रोजी दाखल करण्यात आले होते, दगडपारवा ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 3  रोजी दाखल करण्यात आले होते, गांधीग्राम येथील 28 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, केअर हॉस्पीटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील 13, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, लोहाना हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील 28, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील तीन, अर्थव हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 445 असे एकूण 552 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-35758+10995+177= 46930*
*मयत-827*
*डिस्चार्ज-39564*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6539*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या