buying wheat:Farmers: आमदार सावरकर यांच्या प्रयत्नांना यश; शासनाने काढला आदेश, शेतकऱ्यांचा गहू खरेदीला आजपासून प्रत्यक्षात प्रारंभ





अकोला: मतदारांच्या समस्यांसाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे व संघर्षशील नेतृत्व आ. रणधीर सावरकर यांनी महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने  शेतकऱ्यांचा गहू खरेदी करावा, अशी आग्रहाची मागणी केली होती. अन्यथा जन आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन राज्य शासनाने  रब्बी पणन हंगाम २०२१-२२ मध्ये विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत गहू खरेदी करण्याचे आदेश दिल्यामुळे आमदार सावरकर यांच्या लढा व प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.





आमदार रणधीर सावरकर यांनी १५ दिवसाआधी शेतकऱ्यांच्या घरी गव्हाचे पिक येऊन पडले होते. ते ताबडतोब खरेदी करावे, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासन व महाराष्ट्र स्टेट को.ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा मार्केटिंग अधिकारी डी.वाय शेख यांनी दाखल घेऊन आ. सावरकर यांची मागणी शासन दरबारी कळवून ऑन लाईन शेतकऱ्यांचा गहू खरेदी करणे संबंधी मागणी केली होती. राज्य शासनाने गहू खरेदी करण्यासाठी प्रक्रिया जिल्ह्यात सुरु  केली. या संदर्भात राज्य शासन व  मार्केटिंग फेडेरेशननी शासन निर्णय नुसार  खरेदी करण्याचे अभिवचन आ. सावरकर यांना देऊन आजपासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा गहू खरेदी करण्याची प्रक्रिया आरंभ झाली आहे. 





शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले लोकप्रतिनिधी आ. रणधीर सावरकर सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्ना विषयी संवदेनशील राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सार्वजनिक व व्यक्तिगत समस्यांसाठी सदैव तत्पर राहणारे केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात व मतदार संघात पक्षीय संघटनेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार यांचे कडे पाठपुरावा करून न्यायोचित मागण्या पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक शेतकर्यांनी गहू खरेदी सुरु झाल्या बद्दल आ. सावरकर यांचे आभार व अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या