BJP: पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री निधीसाठी सक्ती करू;शासनाने परिपत्रक मागे घ्यावे- आमदार सावरकर व शर्मा यांची मागणी






अकोला: मुख्यमंत्री निधीसाठी दोन  दिवसाचे वेतन  फ्रंट लाईन covid-19 योद्धा पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचे पगारातून कपात करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. कोरोना काळात ड्युटी करून विशेष भत्ता  न देता आपल्या ड्युटी पेक्षा दुप्पट ड्युटी देणाऱ्या पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्यावर अन्याय असून, शासनाने हे परिपत्रक परत घ्यावे, अशी आग्रहाची मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.


 



राज्य शासनाने 7 मे रोजी परिपत्रक काढून पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांना यांचे दोन दिवसाचे वेतन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून सुद्धा हा निधी जमा करण्यात येणार आहे. निधी जमा करण्याचे अनेक साधन असताना कोरोनाने बळी गेलेल्या परिवाराला मदत शासनाने तर दिलीच नाही उलट त्यांचा पगार कापण्याचा प्रताप शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी करत आहे,असा आरोप आमदार सावरकर व आमदार शर्मा यांनी केला आहे.




हा निर्णय चुकीचा असून, पोलीस हा समाजाचा व व असामाजिक तत्त्व वर वचक ठेवून, सतत अठरा तास ड्यूटी देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराची परिस्थिती लक्षात घेता, शासनाने असा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये, अहोरात्र मेहनत करूनही त्यांना भत्ता देण्यात येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फरक पडत नाही. परंतु पोलीस निरीक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांना याचा फार मोठा फटका बसू शकतो. अनेक पोलिस कर्मचारी यांचे परिवार या महा मारी चे शिकार झाले आहे. त्यामुळे सरकारने नवीन उपाय शोधून काढून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम व्यक्तींकडून कर वसुली करावी. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना यातून सूट द्यावी,अशी देखील मागणी आमदार द्वय  सावरकर व शर्मा यांनी केली आहे.




सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा यामधून सवलत देण्यात यावी. शासनाने परिपत्रकांमध्ये सुधारणा करावी, अशी आग्रहाची मागणी आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या कडे केली. 




मुख्यमंत्री निधीसाठी विविध सामाजिक संघटना व उद्योजक यांच्याकडे तसेच शासनाने यासाठी विशेष प्रयत्न करावेत. फ्रंट लाईन कोरोना योद्धा यांना यातून सूट द्यावी तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा यामधून  सूट द्यावी,अशी मागणी देखील आमदार सावरकर व आमदार शर्मा यांनी  केली आहे.

टिप्पण्या