अकोला: समाज नेते किसनराव यमाजी हुंडीवाले यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुवारी खडकी बु येथे अभिवादन सभा आयोजित केली होती.
आमदार अमोल मिटकरी, आमदार हरीश पिंपळे यांच्यासह समाज व मित्र मंडळ यांनी याप्रसंगी हजेरी लावून कोरोना नियमांचे पालन करून किसनराव हुंडीवाले यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी गरजू व गरिब रुग्णांनी किडनी आजार, हृदय आजार व इतर प्रकारच्या आजारावर मुंबई येथे नामांकित हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करण्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासाठी जनसंपर्क कार्यालय लवकरच खडकी येथे सुरू होणार असल्याचे असे मिटकरी यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा