- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात आपसी वादातून वडील आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. गंभीर अवस्थेत मुलाला अकोला येथे हलवण्यात असून,त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावाची आजची पहाट हादरून टाकणारी उगवली. एकाची हत्या तर एक गंभीर जखमी असून,दोन किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहत होते. बऱ्याच वर्षापासून गावात दोन कुटुंबियात आपसी वाद सुरू होता. आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. यामध्ये अंदाजे 62 वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार झाल्याने देविदास खाली कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा जागीच मृत्यू झाला. देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली. गंभीर अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्याचे सांगितले. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
तीन आरोपी ताब्यात ;एक फरार
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन देशमुख पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने, प्रमिला भीमराव भोजने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी राजू गणपत भोजने घटनास्थळा वरून फरार झाला आहे. आज पहाटे घडलेल्या या हत्याकांडाने भांबेरी परिसर पुरता हादरून गेला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा