World Art day 2021:lockdown: जागतिक कला दिनाला कलावंत दीन! संचारबंदीमुळे नाट्य,चित्रपट व लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ

World Art day 2021: lockdown: Artist poor on World Art Day!  Time of famine on drama, film and folk artists due to curfew (file photo)






ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: वर्षभरापासून lockdown मुळे नाट्य, चित्रपट, लोककलावंत व पडद्या मागील कलाकार व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री यांनी कलावंतांच्या पोटावर मारू नये. लॉकडाऊन काळात कमी युनिट मध्ये कोविड नियम पाळत शुटिंगला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी  चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.



शासनाकडे मागणीचे निवेदन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची संचारबंदी कायम केली असून, या संचारबंदी अंतर्गत विविध क्षेत्रातील कामे पूर्ण बंद केली आहेत. त्यापैकीच कला क्षेत्रात काम करणार्‍या कलावंतांना सुद्धा या पंधरा दिवसाच्या संचारबंदीचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या मार्च पासून कोविड मुळे आधी लोककलावंत आर्थिक संकटात सापडला आहे.  




चित्रपट निर्मिती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तर अनेक वर्षापासून लोककलावंत व नाट्य चित्रपट क्षेत्रावर ज्या लोकांची पोट आहेत, अशा लोकांना कामावर गेल्याशिवाय त्यांच्या घरातली चूल पेटणार नाही अशी स्थिती असताना दर वेळी प्रमाणे प्रत्येक वेळेस संचारबंदीत लोककलावंत, चित्रपट व नाट्य कलावंत यांना या लॉकडाऊनचा  फटका का सहन करावा लागतो हाच मोठा प्रश्न आहे. कोरोनाने मरण नंतर येईल मात्र उपासमारीने मरण आधी येईल, अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाउन मध्ये ना आर्थिक मदत झाली ना अन्नधान्याची मदत झाली. याहीवर्षी याच पद्धतीने या लॉकडाऊन मध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन लोककलावंत किंवा कलावंतांसाठी केले गेले  नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. 



कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे 'ब्रेक द चेन' ( लॉकडाऊन ) लावला असून, अनेक क्षेत्राला सूट दिली आहे. तसेच आर्थिक अनुदान व रेशन देऊ केले आहे. मात्र, गेल्या मार्च 2020 पासून राज्य शासनाने कलाकार, लोककलावंत, तंत्रज्ञ  यांना काहीही मदत केली नाही. आर्थिक पॅकेज दिले गेले नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीला प्रयोग, शूटिंग, कार्यक्रम बंद केले तर अनलॉकच्या काळात सर्वात शेवटी  शूटिंगला खूप सारे बंधने घालत काम करण्याची परवानगी दिली. 




आताही 15 दिवसाचा लॉकडाऊन लावला आहे. ज्यात शूटिंग, लोककलावंताच्या कार्यक्रमांना आणि नाटकाच्या प्रयोगाला बंदी घालण्यात आली आहे तर कलाकारांनी जगायचे कसे   देशातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीचा भाग असणारे, राज्यासह देशात सर्वात जास्त कर देणाऱ्या इंडस्ट्रीचा घटक असणारे हे कलाकार. मग या सर्व स्तरातील कलाकारांवर सतत अन्याय का. काय फक्त कलावंत हा घटक कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत आहे का. विविध क्षेत्राला या लॉकडाऊन मधून वगळण्यात आले आहे.




कलाकारांना गतवर्षी पण शासनाने  ना आर्थिक मदत केली ना धान्याचा पुरवठा केला, यावर्षी हेच चालू आहे. कलाकारांची हालत सध्या अत्यंत  वाईट आहे. कारण मागीलवर्षी आणि याहीवर्षी सर्व जत्रा, यात्रा, उत्सव, लग्नसराई रद्द झाल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर बरोबर शूटिंग, सिरीयल यावर पण बंदी आल्यामुळे बऱ्याच नवोदित कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सारखे 45 हजारांच्यावर सभासद संख्या असणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष यांनी यासंदर्भात अद्याप कुठल्या प्रकारची भूमिका का घेतली नाही असा संतप्त सवाल यावेळी बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे. यासंदर्भात पाटील यांनी शासनाकडे निवेदन पाठविले आहे.



जागतिक कला दिनाला कलावंत दीन


                                     File photo

जगविख्यात कलाकार लिओनार्दो द व्हिंची यांचा जन्मदिवस १५ एप्रिल रोजी जागतिक कला दिन (World Art day) म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा याच दिवशी राज्यातील तमाम कलाकार उपासमारीच्या खाईत लोटले जाणार आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत कलावंतांनी व  चित्रपट सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या