- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Virar hospital fire: Orgasm in Virar West: 13 patients lost their lives
मुंबई: नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमावल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, आज सकाळी विरार येथे एका रुग्णालयाला आग लागून १३ रुग्णांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले.
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास ए सी चा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिस विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे अन्य रुग्णांची आगीच्या तांडवा मधून सुटका झाली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी प्रसार माध्यमांना दिली. आग नियंत्रित केली असून, सध्या अन्य रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतांची नावे -
१) उमा सुरेश कनगुटकर - (स्त्री - ६३ वर्ष)
२) निलेश भोईर - (पुरुष - ३५ वर्ष)
३) पुखराज वल्लभदास वैष्णव - (पुरुष - ६८ वर्ष)
४) रजनी आर कडू - (स्त्री - ६० वर्ष)
५) नरेंद्र शंकर शिंदे - (पुरुष - ५८ वर्ष)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे - (पुरुष - ६३ वर्ष)
७) कुमार किशोर दोशी - (पुरुष - ४५ वर्ष)
८) रमेश टी उपयान - (पुरुष - ५५ वर्ष)
९) प्रविण शिवलाल गोडा (पुरुष - ६५ वर्ष)
१०) अमेय राजेश राऊत - (पुरुष - २३ वर्ष)
११) शमा अरुण म्हात्रे - (स्त्री - ४८वर्ष)
१२) सुवर्णा एस पितळे - (स्त्री - ६४ वर्ष)
१३) सुप्रिया देशमुख - (स्त्री - ४३ वर्ष)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा