remedesivir: राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला; ४ लाख ३५ हजार व्हायल्स केंद्र पुरविणार


The supply of remedesivir increased in the state;  4 lakh 35 thousand vials will be provided by the center

                                     File photo



भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबई : महाराष्ट्र राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील यासाठी पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर शनिवारी केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. 




मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.




यासंदर्भात राज्याला शनिवारी केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर व्हायल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे. 

टिप्पण्या