Oxygen shortage: Akola city: रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार आता कमी; आमदार शर्मा यांनी लिक्विड ऑक्सिजन टँक लावण्यासाठी दिला एक कोटीचा निधी

MLA Sharma has provided Rs 1 crore for the installation of liquid oxygen tanks

                                      संग्रहित चित्र



किसनाबाई भरतीया रुग्णालय आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे उभारणार प्लांट






नीलिमा शिंगणे जगड

अकोला: सध्या राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात कोविड रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला आहे. ऑक्सिजन पुरेपूर उपलब्ध व्हावा, यासाठी  सर्वपक्षीय नेते प्रयत्नशील आहेत. अशातच  सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी व संकटाच्या काळात पाठीशी सदैव उभे राहणारे आमदार गोवर्धन शर्मा  (Govardhan Sharma) यांनी अकोला शहरात लिक्विड ऑक्सिजन टॅंक (liquid oxygen tanks) लावण्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून आरोग्य विभागाकडे आज प्रदान केला आहे. यामुळे निश्चितच रुग्णाच्या नातेवाईकांची ऑक्सिजन मिळवण्यासाठी होणारी धावाधाव काही प्रमाणात कमी होणार आहे,अशी आशा पल्लवित झाली आहे.




ताबडतोब काम सुरू करण्याचे निर्देश

                                      file photo
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना आमदार शर्मा यांनी आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मनपाच्या किसनाबाई भरतीया रुग्णालय टिळक रोड आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय डाबकी रोड या दोन्ही ठिकाणी दहा टन लिक्विड ऑक्सिजन प्लांट व रेमडेसीवीर इंजेक्शन करिता हे एक कोटी रुपये प्रशासकीय मान्यता घेऊन ताबडतोब काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.




अकोल्यात मेन हॉस्पिटल व लेडी हार्डिंग हॉस्पिटल येथे ऑक्सीजन प्लांट आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर अडचण नाही गेली. परंतू वाढती रुग्णांची संख्या पाहता व पाच जिल्ह्याचा भार पाहता आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये, याकरिता आमदार शर्मा यांनी एक कोटी रुपये निधीच्या माध्यमातून  शहरातील व जिल्ह्यातील खाजगी व सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन मुळे मृत्युमुखी पडू नये, यासाठी पुढाकार घेतला आहे.




रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे आमदार शर्मा यांनी मागच्या covid-19 च्या काळामध्ये रुग्णवाहिका दिली प्रदान केली होती. आता ऑक्सीजन प्लांट साठी निधी देण्याची घोषणा केली आहे. हे ऑक्सिजन प्लांट त्वरित उभारल्या जावे एवढी माफक अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या