oxygen plant: paras: राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अकोला सरसावले; पारस विद्युत केंद्रातून होणार 100 क्यूबेक ऑक्सिजन निर्मिती; बच्चू कडू यांनी आज केली पाहणी

Akola moved to alleviate the oxygen shortage in the state;  The Paras power plant will produce 100 cubic meters of oxygen;  Inspected by Bachchu Kadu today




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची  संख्या वाढत असताना सरकारला ऑक्सिजनसाठी धडपड करावी लागत आहे. मात्र, ही धडपड आता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अकोला जिल्ह्यातील पारस विद्युत केंद्रातून 100 क्यूबेक ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज पारस औष्णिक केंद्राला भेट देऊन पाहणी केली.



पारस केंद्रासह राज्यातील पाच औष्णिक केंद्रातून ऑक्सिजन तयार होणार

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने यासंदर्भात महाजनकोच्या हालचालींना वेग आला आहे. अकोला जिल्ह्यातील पारस केंद्रासह राज्यातील पाच औष्णिक केंद्रातून ऑक्सिजन तयार करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. दरम्यान सध्या ऑक्सिजन पुरवठा अभावी कोरोना बाधितांची प्राण जात असल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे.  अशा काळात आपल्या राज्याला औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ऑक्सिजन निर्मितीचा पर्याय समोर येवू लागला आहे. 




अकोला जिल्ह्यातील पारस प्रकल्पासह इतर वीज निर्मिती केंद्रामधून ऑक्सिजन निर्माण होवू शकतो. कारण या ठिकाणी ओझोनायझेशन प्लांट आहेत. कूलिंग टॉवर आहेत. तिथे शेवाळ तयार होऊ नये यासाठी हे कुलिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. औष्णिक विद्युत केंद्रातील कूलिंग टावर मध्ये गरम पाण्याची वाफ वापरण्यात येते. ते रिसायकलिंग करण्यासाठी कूलिंग टावर असतात. तेथे शेवाळ तयार होऊ नये यासाठी ही यंत्रणा आहे. राज्यातल्या पाच औष्णिक वीज निर्मिती केंद्रात हे ऑक्सीजन प्लांट आहे. 



पंधरा दिवसांनी प्रत्यक्षात हे प्रकल्प सुरू होणार

पारस प्रकल्पात शंभर क्युबिक ऑक्सिजनची निर्मिती करता येईल. केंद्रात पहिला संच 50 आणि दुसरा संच याची देखील 50 क्युबिक मीटर प्रति तास एवढी क्षमता आहे. राज्यातील पाचही प्रकल्पात तीन ते चार तासात रिफिलिंग विषमता आहे. पण सध्या या केंद्रातून रोज किती सिलेंडर भरले जाऊ शकतात, यावर अभ्यास सुरू आहे. सुमारे पंधरा दिवसांनी प्रत्यक्षात हे प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती ना. बच्चू कडू यांनी दिली.


 


हा प्रयोग यशस्वी झाला तर महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी मदत होणार आहे, मात्र त्यासाठी अजूनही १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.




खासगी रुग्णालयाला अचानक भेट देवून ना बच्चू कडू यांनी केली पाहणी

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना अकोला जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होता. परंतू शेजारील वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात  अकोल्यातून आता ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने अकोल्यात आज बऱ्याच खासगी कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा झाला. शहरातील बायपास चौकात असलेल्या युनिक हॉस्पिटल मध्ये आज  ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने येथे उपचार घेत असलेले आठ रुग्णांना शासकीय रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. आज या हॉस्पिटलला पालक मंत्री बच्चू कडू यांनी अचानक भेट देवून येथील परिस्थितीची माहिती घेतली.या नंतर संबंधित विभागाला जिल्ह्यासाठी त्वरित ऑक्सिजन टँकर मागवून घेण्याचे आदेश दिले. बच्चू कडू यांच्या तत्परतेमुळे आज जिल्ह्याला ऑक्सिजन मिळणार आहे. मात्र, सद्यस्थितीत ऑक्सिजनची परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी मान्य केले.





टिप्पण्या