Oxygen leakage: नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती; मोठी दुर्घटना,२२ मृत्यूमुखी

                   (Photo:social media)



Oxygen leakage in Nashik;  A major accident 







नाशिक: कोरोना संकट काळात देशामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना आज घडली. नाशिक महानगरपालिका झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक लिकेज झाले आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.





ऑक्सिजन प्लांट लिकेज झाल्याने मोठा हॉस्पिटल परिसरात गोंधळ उडाला होता. प्रशासनाने खबरदारी म्हणून रुग्णांना तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हलवले. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी लिकेज ऑक्सिजन टॅंक दुरुस्त केला आहे. यात काही रुग्णांचा जीव वाचविण्यात यश आले.मात्र,२२ रुग्णांना जीव गमवावा लागला.दरम्यान,  पालकमंत्री छगन भुजबळ रुग्णालयात पोहोचले असून दुर्घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे.




महाराष्ट्रात ऑक्सिजनची सध्या अत्यंत गरज आहे. अशातच संबंधितांच्या हलगर्जी मुळे ऑक्सिजन प्लांट लिकेज झाल्याने  रुग्णांच्या जीवाला निर्माण झाला आहे.या घटनेने इतर रुग्णालय प्रशासनाने धडा घेऊन,वेळोवेळी सर्व यंत्र आणि यंत्रणा चेक करणे आवश्यक आहे.दरम्यान,या घटनेत जवळपास ५० लोक मृत्युमुखी पडले असावे, असे रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे.ऑक्सिजन गळती सुरू असताना काही रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधितांना सांगितले होते,मात्र,त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे, असे एका रुग्णाच्या नातेवाइकांनी माध्यमांना सांगितले.



टिप्पण्या