- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
MPSC EXAM: महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा: ३३ उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार 24
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा - २०२०-२१ चे आयोजन रविवार ११ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र परीक्षार्थींची परीक्षा अकोला शहरातील एकुण ३३ उपकेंद्रावर सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.
या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या करीता सर्व ३३ परीक्षा उपकेंद्राच्या १०० मिटर परिसरात रविवार ११ एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.
*या परीक्षा केंद्रावर या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी एकत्रितरीत्या प्रवेश करण्यास व घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे.
*परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाहीत.
*परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक, इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
*परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे.
*परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशाची मनाई राहील.
*या प्रतिबंधात्मक आदेशातून परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी/ कर्मचारी/ परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांना परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड पार्श्वभूमीवर खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
*यावेळी परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी / अधिकारी / कर्मचाऱ्यांचे थर्मल / इफ्रारेड थर्मामिटरव्दारे तापमान तपासण्यात यावे.
*हवा खेळती रहावी यासाठी परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघडया ठेवाव्या.
(सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहिल.
*मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नये. प्रत्येक परीक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील, अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी.
*परीक्षा केंद्राचे प्रवेशव्दारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी.
*परीक्षा केंद्राच्या परिसराचे सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
*कोणत्याही परीक्षार्थी / अधिकारी / कर्मचारी यांना कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रूग्णालयात भरती करावे.
परीक्षा उपक्रेंद्रांची यादी
उपकेंद्राचे नाव व पत्ता
*शिवाजी आर्ट,कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला
*खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट गोरक्षण रोड अकोला
*श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मुर्तीजापूर रोड, नेहरू पार्क, अकोला
*सिताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड अकोला
*एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट अकोला भाग-1
*एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट अकोला भाग-2
*माऊंट कारमेल स्कुल अग्रसेन चौक स्टेशन रोड अकोला
*भारत विद्यालय तापडीया नगर अकोला
*शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज पुर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला
*श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड अकोला
*भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला
*जि.एस.कॉन्व्हेन्ट मुख्य डाक घरामागे अकोला
*कोठारी कॉन्व्हेन्ट विद्यानगर, गोरक्षण रोड अकोला
*नोएल इंग्लिश हायस्कूल विभागीय वर्कशॉपच्या मागे, कौलखेड रोड अकोला
*जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय,रणपीसे नगर अकोला
*उस्मान आझाद ऊर्दू हायस्कूल, रतनलाल प्लॉट अकोला
*होलीक्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल, जठारपेठ चौक अकोला
*गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिंधी कॅम्प अकोला
*श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ जुने शहर अकोला
*ज्युबिली इंग्लिश हायस्कूल / ज्युनिअर कॉलेज शिक्षण संकुल, रामदासपेठ अकोला
*न्यु इंग्लिश हायस्कूल, शिक्षण संकुल, रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला अकोला
*राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल कॉलेज ऑफ सायन्स, सिव्हील लाईन रोड अकोला
*मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला
*डि.ए.व्ही कॉन्व्हेन्ट स्कूल महात्मा गांधी रोड, अकोला
*मेहरबानु ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स गांधी रोड अकोला
*खंडेलवाल इंग्लिश स्कुल, गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला
*मनुताई कन्या शाळा, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ टिळक रोड अकोला
*अकोला आर्टस कॉमर्स सायन्स कॉलेज सहकार नगर, गोरक्षण रोड अकोला
*सावित्रीबाई फुले जि.प. माध्य. कन्या शाळा वसंत देसाई स्टेडीयम समोर स्टेशन रोड अकोला
*सुधाकरराव नाईक महाविद्यालय, तुकाराम चौक,अकोला
*डवले ज्युनिअर कॉलेज, चाचोंडी रोड मोठी उमरी अकोला
*महाराष्ट्र माध्यमिक शाळा केडीया प्लॉट जठारपेठ रोड अकोला
*बी.आर. हायस्कूल ताजनापेठ मुख्य डाक घरामागे अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा