- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Marathi film drama: lockdown चित्रपट, नाट्य, लोककलावंत वरील निर्बंध हटविण्याची सुप्रिया सुळे यांनी दिली ग्वाही
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,चित्रपट सांस्कृतिक विभागच्या प्रदेश कार्यकारणी बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: कलावंताच्या हक्क व न्यायासाठी लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभाग यांच्या पुढाकारातून संचारबंदीच्या काळात कलावंतांना आर्थिक व मानसिक सहकार्य करण्याच्या हेतूने प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली.
यावेळी ज्येष्ठ कलावंत विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे,सविता मालपेकर, गिरीश परदेशी, संतोष साखरे, सुधीर निकम, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत मानकर, मच्छिंद्र धुमाळे, मेघा घाडगे,असित रेडिज वैभव लामतुरे, संतोष भांगरे उपस्थित होते.
सर्व प्रथम प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी संचार बंदीच्या काळात कलावंतांना का बंधने घातली जातात याकडे सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले, त्यावर सुळे यांनी सुद्धा लवकरच कला प्रकार वरील निर्बंध हटवण्याची ग्वाही दिली.
विजय पाटकर (प्रदेश उपाध्यक्ष) यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्व स्तरातील कलाकारांना कमी युनिट मध्ये कोविडचे नियम पाळत शुटिंगला परवानगी द्यावी आणि त्याच बरोबर कलाकारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली.
प्रिया बेर्डे (अध्यक्ष पुणे जिल्हा मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्री दर्जा लवकरात लवकर द्यावा ,अशी मागणी केली.
सांस्कृतिक विभागाच्या संदर्भातील सर्व निर्णय , मिटिंग , समित्यावरील नियुक्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्यकारणीला सहभागी करून घ्यावे अशी विनंती डॉ.सुधीर निकम (अध्यक्ष मराठवाडा विभाग) यांनी केली.
पुढील १ आठवड्यात सर्व वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष मिटिंग करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश कार्यकारणीला द्यावी जेणेकरून कलाकारांच्या संदर्भातील प्रश्नाचे गांभीर्य समजेल अशी विनंती संतोष साखरे (प्रदेश समन्वयक) यांनी केली.
लॉकडाऊन लावायचा विचार शासन जेव्हा करतो त्यावेळेस पहिल्यांदा नाटक बंद , शूटिंग बंद अस का ? कोरोना हा फक्त कलाकारांमुळेच होतो का ? - असा प्रश्न सविता मलपेकर (प्रदेश सरचिटणीस ) यांनी विचारला.
सर्व इंडस्ट्री , उद्योग धंदे , आयटी कंपनीला नियम पाळून चालू करण्याची परवानगी आहे तर मग शूटिंग ला नियम पाळून परवानगी का नाही ,अशी मागणी मछिंद्र धुमाळ (प्रदेश संघटक ) केली.
विदर्भातील सर्वात मोठी असलेल्या झाडीपट्टी कलावंतांसाठी आर्थिक पॅकेज सोबतच त्यांच्या रोजगाराचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमात शासनाच्या वतीने त्यांना समाविष्ट करून घेण्याची मागणी प्रशांत मानकर यांनी केली.
कलावंतांना ठाणे येथील गडकरी रंगायतन हे नाट्य गृह येथे 25% भाडेपट्टीवर वर्षभरासाठी भाड्याने देण्याची मागणी मेघा घाडगे यांनी केली. कलावंतांना आर्थिक प्रगती सोबतच सन्मानानं वागणुकीची व त्यांना शासकीय जाहिरातीत समावून घेण्याची विनंती अशीत रेडजी यांनी केली. कलावंत विविध आर्थिक अडचणीत असल्याने त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक फी पासून तर घराचा हप्ता भारे पर्यंतच्या अनेक अडचणी कलावंताचा समोर उभ्या असल्याने त्वरित रोजगार प्राप्त झाला पाहिजे अशी मागणी गिरीश परदेशी यांनी केली. सर्व कलावंत यांच्या भावना समजून घेऊन सुप्रियाताईंनी त्वरित योग्य ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिलेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे सुद्धा यानिमित्त कौतुक केले बाबासाहेब पाटील यांनी कलावंताच्या हक्कासाठी पूर्ण महाराष्ट्रात एक मोठी कलावंतची फळी निर्माण केली असून कलावंतांच्या हक्कसाठी दिवस-रात्र झटणारा नेता म्हणून त्यांचा गौरव यावेळी केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा