Fight with Corona:कोरोनाशी लढा: राज्यातील पहिला प्रयोग: पातूर येथे उभारले नि:शुल्क आयुर्वेदिक स्टीम सेंटर; अभ्युदय फाउंडेशनचा पुढाकार


   पहिल्याच दिवशी नागरिकांनी या       उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.







भारतीय अलंकार न्यूज 24

पातूर (अकोला): कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित वाफ घेणे महत्वाचे आहे.  वाफेचे महत्व नागरिकांना व्हावे तसेच याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम अभ्युदय फाउंडेशनने हाती घेतला आहे. या धर्तीवर राज्यातील पाहिले आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारण्यात आले आहे. नागरिकांना या सेंटरवर नि:शुल्क वाफारा देऊन त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ( First Experiment in the State: Free Ayurvedic Steam Center at Patur; Initiative of Abhyudaya Foundation)



लोकार्पण सोहळा

पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने कोरोना काळात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत.  दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा सोमवार, 26 एप्रिल रोजी  पार पडला. पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव,  नायब तहसीलदार ए. एफ. सैय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे , ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत  उपस्थित होते. 




नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे  नि:शुल्क सुरु

पातूर येथील तहसील कार्यालय येथे या सेंटरचे उद्घाटन पार पडले.  उद्यापासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे नागरिकांसाठी नि:शुल्क सुरु राहणार आहे.  या अभिनव सेंटर च्या उभारणीसाठी अभ्युदय फाउंडेशनचे डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, शुभम पोहरे,  प्रा.चंद्रमणी धाडसे,  प्रा. नरेंद्र बोरकर, शुभम उगले, विलास देवकर,  संतोष लसनकर आदींनी सहकार्य केले. 

टिप्पण्या