- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
भारतीय अलंकार न्युज 24
अकोला: अकोला तालुक्यातील टाकळी पोटे येथील विठ्ठल नथुजी ठाकरे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्री दवणे यांनी दिले.
बोरगाव मंजू पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या टाकळी पोटे शिवारात 12 एप्रिलच्या रात्री विठ्ठल नथुजी ठाकरे या शेतकऱ्याचा निर्घुण खून करण्यात आला होता. बोरगाव मंजू पोलिसांनी या प्रकरणी योगेश हरिभाऊ जळमकर (26) हरिभाऊ लक्ष्मण जळमकर (55) राहणार. टाकळी पोटे या बापलेकास संशयावरून अटक केली.
घटनेच्या आधी मृतक आणि आरोपी यांच्यात शेती नावावर करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. यावेळी आरोपींनी विठ्ठल नथुजी ठाकरे यांना मुंडके तोडून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच हा वाद मिटल्यानंतर दत्ता ठाकरे याने मृतकला जवळा खुर्द शिवारातील पद्मा बाई राऊत यांच्या शेतावर भुईमुगाची रखवाली करण्यासाठी सोडून दिले होते. यानंतर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी पिता पुत्रास अटक केली.
या हत्या प्रकरणाचा तपास पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सुरू केला आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून मृतक विठ्ठल ठाकरे (45) यांना अतिशय क्रूरतेने मारले आहे. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी कडून गुन्ह्याचा घटनाक्रम निश्चित करणे आहे. शस्त्र आणि कपडे जप्त करणे आहे. या कारणासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची गरज आहे असा युक्तिवाद सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे व बोरगाव पोलिसांनी केला. उभयतांच्या युक्तिवाद नंतर न्यायालयाने आरोपींना पी सी आर मंजूर केला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा