Coronavirus in Akola: कोविड रुग्णांच्या उपचारात अनियमितता; सहा हॉस्पिटल चालकांना दंड

                                      file photo


Coronavirus in Akola: Irregularities in the treatment of covid patients;  Six hospital drivers fined



भारतीय अलंकार news24

अकोला: कोविड हॉस्पिटल म्हणून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना अनियमितता असल्याने व  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन  न केल्याबद्दल  अकोला येथील सहा हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. एका रुग्णालयात रुग्णाला जादा शुल्क आकारले म्हणून आकारलेले जादा शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत.


याबाबत आदेश मध्ये  देण्यात आलेली माहिती अशी की, येथील सिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, आधार हॉस्पिटल नवीन बस स्टॅन्ड जवळ हार्मोनी हॉस्पिटल, माऊंट कारमेल शाळेजवळ, श्री गणेश हॉस्पिटल, रतनलाल प्लॉट चौक,  डॉ. भिसे यांचा दवाखाना , जयहिंद चौक व  बिहाडे हॉस्पिटल या ठिकाणी  कोविड रुग्णांवर होत असलेल्या उपचाराची जिल्हाधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीने पाहणी व चौकशी केली. याठिकाणी प्रामुख्याने खालील अनियमितता दिसून आल्या-  आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशीराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनाला न कळविणे, कोविड चाचणी निगेटिव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना शासनाच्या रुग्णालयात वा कोविड रुग्णालयात संदर्भित करण्या ऐवजी नातेवाईकांच्या संमतिशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचनांप्रमाणे डीसीएच किंवा डी सी एच सी ला तात्काळ संदर्भित न करणे इ. तसेच बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचेही चौकशीत आढळल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे.


यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक हॉस्पिटलचालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व बिहाडे हॉस्पिटलला रुग्णाला जादा आकारलेली रक्कम परत करण्याचे आदेशीत केले आहे. तसेच  याबाबतची अनियमितता दिसून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.




टिप्पण्या