corona update:Akola: आज सकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह;रॅपिड अँटिजेंन चाचण्यात ९१ पॉझिटिव्ह, सहा मृत्यूची नोंद

                  *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १२७९* 
*पॉझिटीव्ह-१११*
*निगेटीव्ह-११६८*


 
*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३६ महिला तर ७५ पुरुष आहेत. त्यातील कौलखेड व मोठी उमरी येथील नऊ, पारस येथील सहा, खडकी येथील चार,  खोलेश्वर, गोरक्षण रोड, शास्त्री नगर, लहान उमरी येथील प्रत्येकी तीन,  तेल्हारा, सिंधी कॅम्प, मित्र नगर, जीएमसी, रतनलाल प्लॉट,  राऊत वाडी, गांधी रोड, पैलपाडा आणि बाभुळगाव येथील प्रत्येकी दोन,  उर्वरीत अंदुरा, दहिगाव ता. तेल्हारा, गाडेगाव, दापुरा, हिवरखेड,  सौंदळा, अकोट, रामदास पेठ, शिवर,  खरप, चौरे प्लॉट, शंकर नगर,  तुकाराम चौक, कीर्तीनगर, हिंगणा फाटा, सुधीर कॉलनी, हातरुण, सस्ती, उमरी, व्हीएचबी कॉलनी, रामनगर, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड, कलाल ची चाळ, जयहिंद चौक, दगडी पूल,  देवराव बाबाची चाळ, राजंदा, तारफैल, बापू नगर, शेळद, गोकुळ कॉलनी,  जठारपेठ, बोरगाव मंजू, न्यू तापडीया नगर, महसूल कॉलनी, दहातोंडा, गाडगे नगर, हिंगणा रोड, शिवसेना वसाहत, सावरगाव, देऊळगाव, पातूर,  माळराजूरा, आगीखेड, चैतन्य नगर, सिंदखेड, बाळापूर, आझाद कॉलनी, राजनखेड, बार्शी टाकळी, उरळ आणि माळीपुरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.



दरम्यान काल(दि.६) रोजी रॅपिड अँटिजेंन चाचण्यात ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह संख्येत करण्यात आला आहे,याची कृपया नोंद घ्यावी,ही विनंती.



दरम्यान, आज सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.  त्यात-खदान येथील ६० वर्षीय महिलाअसून या महिलेस दि.२२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. कुणबीपुरा सिंदखेड ता. बार्शीटाकळी येथील  ५९ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.६ रोजी दाखल केले होते. पारस येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.४ रोजी दाखल करण्यात आले होते. जुने शहर भागातील ५४ वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.४ रोजी दाखल करण्यात आले होते.तुकाराम चौकातील  ७२ वर्षीय पुरुष असून त्यांना आजच मृतावस्थेत दाखल केले होते. 
रणपिसेनगर येथील ६४ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२ रोजी दाखल केले होते.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३६३२+५६८८+१७७= २९४९७*
*मयत-४८४*
*डिस्चार्ज-२४९९०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०२३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या