corona update: अकोला:आज सकाळी १२९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ;दोघांचा मृत्यू, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये १०४ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*
                                      file image

 
*आज मंगळवार दि. ६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
 
*प्राप्त अहवाल- ९६५* 
*पॉझिटीव्ह-१२९*
*निगेटीव्ह-८४६*


 
*अतिरिक्त माहिती*
 
आज सकाळी १२९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४४ महिला व ८५ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव,दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशीम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानन नगर, बाळापूर,जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपूरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहर नगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंद नगर, सस्ती, आलेगाव, टिळकरोड, तोष्णिवाल लेआऊट, गायत्री नगर, रुईखेड, दानापुर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेतान नगर,  पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गितानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथिल प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


 
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि.५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष असुन या रुग्णास दि.२७ मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णांचा आज मृत्यू झाला.


 
 
दरम्यान काल (दि.५) रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १०४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


 
*आता सद्यस्थिती*
 
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३४९३+५५९७+१७७= २९२६७*
*मयत-४७६*
*डिस्चार्ज-२४६०३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४१८८*
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या