corona update: Akola: आज दिवसभरात एकूण 708 पॉझिटीव्ह; दहा जणांच्या मृत्यूची नोंद

            *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २२ एप्रिल २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २३९७*
*पॉझिटीव्ह-५४६*
*निगेटीव्ह-१८५१*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ५४६+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १६२= एकूण पॉझिटीव्ह- ७०८

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात ५४६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २११ महिला व ३३५ पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-७९, अकोट-१४, बाळापूर-सात, तेल्हारा-१४, बार्शी टाकळी-८३, पातूर-९७, अकोला-२५२. (अकोला ग्रामीण-५४, अकोला मनपा क्षेत्र-१९८)



आज दिवसभरात दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात डोंगरगीरी येथील ५५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य आझाद कॉलनी येथील ७६ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, पत्रकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, म्हाडा कॉलनी, कौलखेड येथील ६० वर्षीय महिला असून या महिलेस दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर तिवसा येथील ४२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, चवरे प्लॉट येथील ३१ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल करण्यात आले होते.  वाशिम बायपास येथील ७० पुरुष रुग्णास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते, गायत्री नगर मोठी उमरी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि.१९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच खाजगी रुग्णालयातील दोघांचे मृत्यू झाले. त्यात शिलोडा येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य श्रावगी  प्लॉट येथील ७३ वर्षीय महिला रुग्णास दि.२१ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, इंदिरा हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून ११, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील पाच, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालयातून १३, देवसार हॉस्पीटल येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, मुलाचे वसतीगृह येथील २०, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, नवजीवन हॉस्पीटल येथील तीन,  तर होम आयसोलेशन मधील ४२ असे एकूण १२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२८२३६+७७३२+१७७= ३६१४५*
*मयत-६०२*
*डिस्चार्ज-२९३७३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६१७०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या