corona update: Akola: आज 188 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्ण मृत्युमुखी

            *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ४६८* 
*पॉझिटीव्ह-९४*
*निगेटीव्ह-३७४*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ९४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३४ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील सात, खडकी येथील सहा, मोठी उमरी व पारस येथील प्रत्येकी पाच, कच्ची खोली येथील चार, मलकापूर, आदर्श कॉलनी व विवरा येथील प्रत्येकी तीन, रजपूतपुरा, सिव्हील लाईन, गौतम नगर, डाबकी रोड, मोठा राम मंदिर, आश्रय नगर, संताजी नगर, रमेश नगर, पक्की खोली व भंडारज बु. येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित देशमुख पेठ, जूने आळसी बाजार, मेहबुबनगर, वारेगाव मंजू, टॉवर चौक, कृषी नगर, जूने शहर, रानी हेरिटेज, भगीरथ नगर, लहान उमरी, खोलेश्वर, जठारपेठ, दुर्गाचौक, सूधीर कॉलनी, बाळापूर रोड, भरतपूर ता.बाळापूर, मो.अली रोड, जैन मंदिर, देवी खदान, नागपूरी जिन, दामिनी हॉस्पीटल मागे, केशवनगर, हिरपूर ता.मुर्तिजापूर, मालीपूरा, अकोटफैल, रणपिसे नगर, बैलपाडा, रामनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, लोकमान्य नगर, खदान, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, तांडाली, महात्मा फुले, किर्ती नगर व बलवंत नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज पाच मृत्यूची नोंद झाली. त्यात डाबकी रोड येथील ५० वर्षीय महिला असून या महिलेस दि. ९ रोजी दाखल केले होते. अन्य मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय महिला असून या महिलेस दि.९ रोजी दाखल केले होते. तर ८२ वर्षीय गॅलेक्सी पार्क हिंगणा येथील पुरुष असून  या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते. तर अन्य रुग्ण शिवणी येथील ९२ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ११ रोजी दाखल केले होते. तसेच पंचशील नगर येथील ६५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ४ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ९४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४६५३+६१८५+१७७= ३१०१५*
*मयत-५१३*
*डिस्चार्ज-२६४१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४०९२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या