- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Corona test: विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनी कोविड चाचणी करावी - जिल्हाधिकारी पापळकर यांचे आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संग्रहित चित्र
*अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या प्राधान्याने कराव्यात
*आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या व्यापारी व त्यांच्याकडील कामगारांनीही कोविड चाचणी करणे बंधनकारक
भारतीय अलंकार 24
अकोला: जिल्ह्यात कोविड संसर्गाचा प्रतिरोध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यात विवाह सोहळ्यात ५० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. तथापि, विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनीही कोविड चाचणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके तयार केली आहेत. विवाह सोहळ्यास बाहेरगावाहून पाहुणे येत असतात. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित संख्या मर्यादांचे पालन करतांना विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींनीही चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या प्राधान्याने कराव्यात
जिल्ह्यात कोविड संसर्गाची प्रतिरोध करण्यासाठी कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकट व दूरस्थ संपर्कातील अति जोखमीच्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या प्राधान्याने कराव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरस्निंग द्वारे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधला व आढावा घेतला. या आढावा बैठकीस जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार,विश्वनाथ घुगे, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांचा सहभाग होता. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की, येत्या तीन दिवसांत सुट्यांच्या कालावधीत नियोजन करुन अधिकाधिक लोकांच्या चाचण्या कराव्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संपर्क साखळी तपासून त्यातील व्यक्तींच्या चाचण्या ह्या प्राधान्याने कराव्या.
आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या व्यापारी व कामगारांना कोविड चाचणी बंधनकारक
जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या आठवडी बाजारात दुकाने लावणाऱ्या व्यापारी व त्यांच्याकडील कामगारांनीही कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. बाजारात दुकान लावताना कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. खाजगी रुग्णालये, दवाखाने येथे तपासणीसाठी व कोविड लक्षणांसारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवा. त्यासाठी पथक गठीत करा. याबाबत जनजागृतीही करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा