Corona impact: Akola: वडिलांना पाहण्यासाठी मुलाने केली इच्छा व्यक्त; परवानगी नाकारल्याने संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड, गैरसमजातून घडला प्रकार, युवक पोलिसांच्या ताब्यात

The son expressed a desire to see the father ;  The hospital was vandalized by angry relatives for refusing permission





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : कोविड विषाणूचा उद्रेक भयंकर झाला आहे. रुग्ण मृत्यू संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णालयात दगावलेली रुग्णाच्या नातवाईकांची स्थिती बघविल्या जात नाही. एवढी विदारक स्थिती सध्या निर्माण झाली आहे. आज जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड केंद्र येथे असाच एक प्रसंग घडला. आपले वडीलांचा मृत्यू झाला, असे कळताच मुलाने वडिलांना भेटण्याची आणि पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, रुग्णालय प्रशासन आदेशान्वये सुरक्षा रक्षकाने अडविले असता, या मुलाने व अन्य नातेवाईकांनी  संतापाच्या भरात रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना आज घडली.   मात्र, सदर रुग्ण दगावले नव्हते, नातेवाईकांना माहिती मिळाली होती की ते दगावले. वास्तविक रुग्णाला व्हेंटिलेटर सुरू केले होते, अशी माहिती मिळाली आहे. आजचा प्रकार गफलतीने घडला असल्याचे समजते. 



रुग्णालयाची तोडफोड

कोविडवर उपचार सुरू असतांना वडील दगावले, अशी माहिती कुटुंबीयांना मिळाली होती. मुळात कोविड केंद्रात बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही.  कुटुंबीयांनी वडिलांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने या कुटुंबियांना केंद्रात प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयाची तोडफोड सुरू केली. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाला या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला इजा पोहोचली आहे. 




तणावाचे वातावरण

दरम्यान, कोविड केंद्रात उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालय प्रशासनासमोर असुविधांचा पाढा वाचला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सुमारे दोन तास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



फोटो गॅलरी







टिप्पण्या