breaks bribery chain: एसीबीने लाचखोरीची चेन केली ब्रेक ; पुरवठा निरीक्षक पाठोपाठ तहसिलदारास अटक;महसूल विभागात खळबळ

ACB breaks bribery chain;  Tehsildar arrested after supply inspector; agitation in revenue department (Symbolic photo / archived photograph)




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळसकर याच्या अटके नंतर शुक्रवारी तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे याला गजाआड केले . या प्रकरणात आणखी आरोपी सामील असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदाराच्या अटकेनंतर मात्र  लाचखोरांची ही शृंखला खंडित झाली आहे. या प्रकरणामुळे महसुल प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे. 



पुरवठा निरीक्षक कळसकर याने साडेपाच हजारांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी ७ एप्रिल रोजी एसीबीने त्याला ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याची कसून चौकशी केल्यावर अकोल्याचे तहसिलदार लोखंडे या प्रकरणात सामील असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळले. या आधारे तहसिलदार लोखंडे याला अटक करण्यात आली.

 

 

गोरगरीबांना मोफत धान्य वाटप योजनेत स्वस्त धान्य दूकानदाराचा मोबदला देण्यासाठी साडेपाच हजारांची लाचची मागणी पुरवठा निरीक्षक कळसकर याने केली होती. त्याने प्रत्यक्ष लाच घेतली नव्हती. परंतू, अन्य पुराव्याच्या आधारे त्याला लाच विभागाने अटक केली होती. पोलीस कोठडीत चौकशी व इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तहसिलदार लोखंडे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गुन्ह्याच्या तपासातील नोंदी व दस्तऐवज यावरुन तहसिलदार लोखंडे याने पदाचा दूरुपयोग केल्याचे व गैरफायदा मिळविण्याच्या उद्देशाने कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आय.व्ही.चव्हाण यांनी दिली.



अकोलाचे तहसिलदार असलेले विजय लोखंडे यांच्याकडे खनिकर्म विभागाचा अतिरिक्त भार सोपविला असून, त्याने त्या विभागात देखील काही गैरप्रकार केलेत काय, याचा देखील शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेण्याची गरज असल्याची कुजबुज महसुल विभागात सुरू आहे.


पाच हजार पाचशे मागणे पडले महागात


कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या अंदाजे ५५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश देण्यासाठी १० टक्के याप्रमाणे पाच हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी बोरगाव मंजू येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला कळसकर याने केली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक नीलेश कळसकर याला अटक केली होती. कळसकर पोलीस कोठडीत असताना त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर या लाचखोरी प्रकरणात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार लोखंडे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू होती.



टिप्पण्या