Assam: earthquake:आसामसह पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले!

Some eastern states including Assam were shaken by the earthquake(photosource:Twitter:himanta biswa) 






आसाम राज्यासह पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. आसाम मध्ये आज सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी एका पाठोपाठ दोन झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल एवढी होती. 





राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनितपूर मधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले.




एनडीआरएफ ने दिलेल्या माहितीप्रमाणे गुवहाटी आणि तेजपूर मधील इमारतींना तडे गेले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश सह उत्तर बंगालमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. जवळपास ३० सेंकद हादरे जाणवले असल्याचे कळते .






आसामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावे. सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल यांनी दिली. 




भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करून भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असल्याची माहिती दिली. 




अरुणाचल प्रदेशचे डीआयजीपी मधुर वर्मा यांनी देखील भूकंप यासंदर्भात ट्विट केले आहे. इटानगर मध्ये मोठ्या तीव्रतेचे झटके जाणवले असून, घरं पूर्ण हादरली होती. जवळपास ३० सेंकट भूकंपाचे झटके जाणवले. कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.




    (photo source:Twitter)




…...


टिप्पण्या