Anil Deshmukh: political news: अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडीचे पारदर्शक सरकार- बच्चू कडू





भारतीय अलंकार 24

अकोला,दि.५ : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकारच पारदर्शक सरकार, असे  राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.  


ना.कडू आज अकोला दौरावर असतांना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा त्यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी निरपेक्ष आणि पारदर्शी व्हावी,चौकशीत कोणताही अडथडा येऊ नये, यासाठी देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याचे बच्चू कडू म्हणाले.



विदर्भातील मंत्री टार्गेट होत आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी यात कोणताही प्रांतवाद दिसत नसल्याचे म्हणाले. 




अकोल्यात शनिवार आणि रविवार लॉक डाउन रद्द करण्याबाबत राज्यसरकारला आम्ही विनंती करणार असल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.





राजीनामा चौकशी कालावधी पुरताच आहे का


दरम्यान, आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची चौकशी करताना या पदावर राहणे नैतिक दृष्ट्या योग्य नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.




मात्र, या पत्रात कुठेही माझा राजीनामा स्वीकारावा. असे त्यांनी म्हटलेले नाही. त्यांच्या पत्रात 'पदापासून दूर राहण्याची इच्छा आहे, कार्यमुक्त करा, अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला आहे. राजीनामा शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. यापूर्वो  संजय राठोड यांच्या राजीनाम्यात राजीनामा शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा चौकशी कालावधी पुरताच आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे.


 काय म्हटलं पत्रात


 मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांनी ऍड जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज ५ एप्रिल २०२१ रोजी पारीत केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी. बी. आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुषंगाने मी मंत्री (गृह) या पदाकर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वतः या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला मंत्री (गृह) या पदावरून कार्यमुक्त करावे. ही नम्र विनंती.



टिप्पण्या