high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
high-court-nagpur-murder-case : दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात; खटल्याला विलंब – आरोपीला जामीन मंजूर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाअकोला: शहर वाहतूक शाखा अकोलाचे कर्मचारी अधिकारी लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणी करिता दिवसरात्र रस्त्यावर आहेत. रिकोर्डब्रेक कारवाया सोबत कागदपत्रे नसलेली व संशयास्पद वाहने सुद्धा चेक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी नाकाबंदी दरम्यान शाहीन मोटारसायकल क्र MH27 AY 3239 ही मोटारसायकल शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे यांनी चौकशी साठी थांबवली असता त्याचे कडे दुचाकींचे कागदपत्रे नसल्याने व दुचाकीवर टाकलेला क्रमांक हा अस्पष्ट दिसत असल्याने संशयावरून ही दुचाकी वाहतूक कार्यालयात लावून त्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना दिली. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता, ही दुचाकी ही 22 मार्च 2018 रोजी अमरावती शहरातील गाडगे नगर भागातून चोरी गेल्याची माहिती मिळाली.
याबाबत दुचाकी मालक कपिल किसनराव सुखदेव राहणार वीटभट्टी वडाळी नाका अमरावती यांनी दिलेल्या फिर्याद वरून 23।3।18 रोजी गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती मिळल्यावरून शहर वाहतूक पोलीस अकोलाने या दुचाकी मालकाचा फोन क्रमांक प्राप्त करून त्यांना दुचाकी बाबत माहिती दिली. तसेच गाडगे नगर पोलिसांना सुद्धा माहिती देण्यात आली.
गाडगे नगर पोलिसांचे एक पथक फिर्यादी सह शहर वाहतूक शाखेच्या कार्यलयात आले असता, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी खात्री करून दुचाकी ताब्यात दिली. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस निरीक्षक गजानन शेळके व ज्ञानेश्वर चिकटे यांना एक हजार रुपये बक्षीस जाहीर करून कौतुक केले. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिकटे यांनी पार पाडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा