- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
File photo
भारतीय अलंकार 24
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया मंगळवारी रात्री यशस्वी झाली असून,त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बुधवारी पहाटे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमाना दिली.
पवार यांची प्रकृती परत अचानक बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरंतर पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. परंतू, मंगळवारी रात्री पवार यांच्या पोटात वेदना जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॅल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले होते. मात्र, त्रास जास्तच होत असल्याने त्यांच्यावर त्वरित मंगळवारी रात्री उशीरा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
दरम्यान, देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार केरळ आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पोटाच्या त्रासामुळे त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाने दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा