Sharad Pawar: शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी भरती, सध्या प्रकृती स्थिर

                               Sharad Pawar




भारतीय अलंकार 24

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांची तब्येत बिघडली असून, त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूूत्रकडून प्राप्त झाली.



राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली. रविवारी सायंकाळी त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ३१ मार्चला पवारांवर एन्डोस्कोपीनंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.




काल दिवसभर शरद पवार अमित शहा भेटीची चर्चा समाज माध्यमात चालल्या.याबाबत मिम्स देखील व्हायरल झालेत. मात्र, आज सकाळपासून अचानक सोशल मिडियावर शरद पवारांच्या स्वास्थ्य संदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, असे संदेश आता येत आहेत.



दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे',असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या