- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: एल्गार परिषदेच्या मंचावर येऊन महाराष्ट्रातील पुण्यात हिंदू धर्माबाबत आक्षेप जनक वक्तव्य करणाऱ्या शार्जील उस्मानीला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध आज भाजयुमो अकोला महानगर व ग्रामीण तर्फे स्थानिक ओपन थियेटर चौकात करण्यात आला.
हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शार्जील उस्मानी विरोधात FIR दाखल होऊनही त्याला अटक न करता पाठीशी घालण्याचा कारभार या राज्यसरकारने लावला आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून भाजयुमोचे आज केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, अकोला पश्चिमचे जेष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांच्या मार्गदर्शनात निषेध नोंदवण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना सरकारमध्ये अशाप्रकारे हिंदु समाजाला सडका म्हणणाऱ्या उस्मानीला वाचण्याचा प्रकार सत्तेसाठी करण्यात आला हिंदू समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा प्रतीकात्मक स्वरूपात covid-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आंदोलन केले.
यावेळी युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष उमेश गुजर, जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, किरण आवताडे, महानगर सरचिटणीस अभिजीत बांगर ,गोपाल पाथ्रीकर, भाजप पश्चिम दक्षिण मंडळाचे अध्यक्ष अमोल गोगे, भाजयुमो महानगर उपाध्यक्ष महेंद्र राजपूत, कृष्णा पांडे, भाजयुमो मध्य मंडळ अध्यक्ष भूषण इंदोरिया, अक्षय जोशी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा