MPSC EXAM 21: अकोला सज्ज: 18 उपकेंद्रावर 4 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार ; उमेदवारांना बेसिक कोविड किट उपलब्ध राहणार

एमपीएससी राज्यसेवा (पुर्व) परिक्षेचे आयोजन

                                      संग्रहित चित्र


 



भारतीय अलंकार 24

अकोला: महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे जिल्ह्यात रविवारी (दि. 21) रोजी  महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर सकाळी 10 ते 12 व दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. एमपीएससी परीक्षेकरीता एकूण 4 हजार 977 उमेदवार परीक्षा देणार असून  परिक्षेकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आले आहे. त्यात पाच समन्वय अधिकारी, 18 केंद्रप्रमुख, 76 पर्यवेक्षक तर 244 समवेक्षक यांची सेवा परिक्षेकरीता घेण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.



28 कर्मचारी पॉझिटिव्ह;त्याऐवजी अतिरिक्त नियुक्त


कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आले आहे. त्याकरीता परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी करण्यात आले असून, चाचण्या करण्यात आलेल्या एकूण 374 नमुनेपैकी  28 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेले कर्मचाऱ्‍यांना बदलुन त्यांचेऐवजी अतिरिक्त कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 




प्रत्येक उपकेंद्रावर बेसिक कोविड किट (Basic Covid kit), परिक्षेकरिता उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हातमोजे, मास्क, सॅनिटायझर दिल्या जाणार आहे.  तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी  फेसशिल्ड, हातमोजे, मास्क व सॅनिटायझर वापर करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरीता Personal Protective Equipment Kit (PPEK)  दिल्या जाणार आहे.




टिप्पण्या