Indian Railway: हावडा - मुंबई गीतांजली एक्सप्रेसचा शेवटचा डबा रुळावरुन घसरला; नागपूर ते मुंबई रेल्वेमार्ग बाधित

Indian Railway: The last coach of Howrah-Mumbai Gitanjali Express derailed;  Traffic jams



हावडा ते मुंबई जाणारी 02260 गीतांजली एक्सप्रेसचा गार्ड कोच  रुळावरून घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित. रेल्वे अधिकारी घटना स्थळी उपस्थित. नागपूर ते मुंबई रेल्वेमार्ग बाधित.




भारतीय अलंकार 24

मूर्तिजापूर (अकोला) : पश्चिम बंगाल - महाराष्ट्र या दोन राज्याच्या राजधानी दरम्यान धावणाऱ्या अति वेगवान हावडा - मुंबई गीतांजली एक्सप्रेसचा एक डबा मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान अचानक काटेपूर्णा रेल्वे स्टेशन दरम्यान रुळावरुन घसरला. या अपघातात  जीवितहानी झाली नाही. घटनेची माहीती मिळताच रेल्वे प्रशासनाने व  वंदे मातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 



हावडा - मुंबई सुपरफास्ट गितांजली एक्सप्रेस या गाडीचा एक शेवटचा डबा काटेपूर्णा जवळ पैलपाडा गावा दरम्यान रुळावरुन घसरला. यावेळी रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखून गाडीचा वेग नियंत्रणात आणला. मागचा सर्वात शेवटचा डबा घसरल्याने तो डबा समोरच्या डब्यावर आदळत दुर पर्यंत गेला. 



उखडलेला लोहमार्ग दुरुस्तीचे काम सुरु

कोविड संक्रमण लक्षात घेता, सुदैवाने गाडीत नेहमी सारखी गर्दी नसल्याने व शेवटचा डबा घसरल्याने आर्थिक नुकसान व जीवीत हानी झाली नाही. त्याच बरोबर मोठा अनर्थही टळला. उखडलेला लोहमार्ग दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून, या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे

टिप्पण्या