Farmer agitation: Akola: गावात जल संधारणाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी शेतकरी पुत्रांनी केलं समाधी आंदोलन!

Samadhi agitation was carried out by the sons of farmers to complete the water conservation work in the village immediately




भारतीय अलंकार 24

अकोला: गावात जलसंधारणाचे काम त्वरित पूर्ण करावे, या मागणीसाठी शेतकरी पुत्रांनी समाधी आंदोलन केले. बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा येथील गावकऱ्यांनी हे अनोखे आंदोलन करून, शासनाचे लक्ष आपल्या न्यायहक्क मागण्यांकडे वळविण्याचा प्रयत्न केला.



पाणीटंचाई दूर करण्यासाठी शेततलाव

मागील सरकारच्या काळात पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाव खेड्यात शेततलाव बांधण्यात आले. मात्र, अनेक काम अर्धवट राहिले त्यामुळे केलेले 75 टक्के काम पूर्ण वाया गेले आहे. टाकळी निमकर्दा गावात सुद्धा हीच परिस्थिती आहे.



पाच वर्षे उलटूनही काम रखडलेले

सन 2015 - 16 मध्ये 40 लाख खर्च करून गाव शेजारी 100 बाय 100 मीटर चे दोन तलाव बांधण्यात आले. मात्र, या तलावाला इनलेट आउटलेट पक्के बांधलेले  नसल्यामुळे पावसाचे पाणी यामध्ये साठवले जात नाही. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. या गाव तलावाला ताबडतोब भिंत बांधून द्यावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी समाधी आंदोलन केले आहे. 



लाखो गॅलन पाणी दरवर्षी वाया

या तलावांना आउटलेट नसल्यामुळे पावसाचे लाखो गॅलन पाणी दरवर्षी वाया जात असते. शासनाने या कामावर लाखो रुपये खर्च केले असून, याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. या गाव तलावाला गेट लावण्याचे काम कंत्राटदारा कडे होते. परंतु संबंधित ठेकेदाराने हे काम न करताच पूर्ण पैसे शासनाकडून वसूल केले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शेततलावचे काम शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या ठिकाणी पक्के बांधकाम न केल्याने गावातील शेतकरी पुत्रांनी स्वतःला जमिनीत समाधी देत आंदोलन केले असल्याचे गावकरी गोपाल पवार यांनी सांगितले.




टिप्पण्या