Encroachment: अकोला: न्यू क्लॉथ मार्केट जवळ अतिक्रमण धारकांनी केली पथकावर दगडफेक; काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण



भारतीय अलंकार 24

अकोला: सिटी कोतवाली पोलीस स्टेशन  अंतर्गत असलेले न्यू क्लॉथ मार्केट जवळ आज महानगर पालिका अतिक्रमण विभाग कडून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. मात्र, कारवाई सुरू असताना अतिक्रमण धारकानी दगडफेक  करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे काहीवेळ   तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.



प्रदीर्घ रजेनंतर महापालिकेत रुजू झालेल्या मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी दोन दिवसांपासून पुन्हा अतिक्रमणाचा सफाया करणे सुरू केले. इंदौर गल्ली, खुले नाट्यगृह ते फतेह अली चौक, जनता भाजी बाजार, जठारपेठ चौक आदी ठिकाणी आतापर्यंत कारवाईचा बडगा उचलला. शनिवारी सायंकाळी जठार पेठ चौकात अतिक्रमण हटविणाऱ्या मनपाच्या पथकासोबत परिसरातील अतिक्रमकांनी वाद घातला होता. तर आज मंगळवारी न्यू क्लाथ मार्केट परिसरात अतिक्रमण धारकांनी मनपा व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.




शहरातील मुख्य बाजारपेठ, शासकीय आवारभिंती, मोठे नाले तसेच प्रमुख चौकामध्ये अतिक्रमणांनी अतिक्रमण केलेले आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडी सह अनेक समस्यानी शहराला विळखा घातला आहे. अतिक्रमण धारकांच्या  दादागिरी समोर प्रशासनाने गुडधे टेकले  आहेत.  



अकोला महापालिकेत दरवेळी नवे आयुक्त नियुक्त झाल्यानंतर सुरवातीला अतिक्रमण काढण्याचे जणू व्रत हाती घेतात.मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कारवाईचा फास सैल होतो आणि अतिक्रमण जसेच्या तसेच राहते हे विशेष उल्लेखनीय ! 



आयुक्त मॅडम इकडे पण लक्ष असुद्या !

शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात पक्के बांधकामाचे अतिक्रमण  करण्यात आले असून त्याकडे सुद्धा लक्ष द्यावेत , तसेच जवाहर नगर चौक ते शासकीय दुध डेअरी मार्गावर असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न मोठ्या दिवसापासून प्रलंबित आहे , १८६ अनधिकृत बांधकामे, अनधिकृत मोबाईल टॉवर या सर्व बाबींकडे आयुक्त निमा अरोरा यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी अकोलेकरांनी केली आहे.





टिप्पण्या