Covid 19 Test: Akola: कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढवा- मदन भरगड यांची मागणी

*मनपा प्रशासनानी दुकाने सील करने बंद करावे 




भारतीय अलंकार24

अकोला : प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सकाळी 9 ते सायंकाळी पाच पर्यंत उघडण्याची परवानगी दिली. मात्र, दुकानदार व दुकानामधील  कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी केली असेल तरच दुकान उघडता येईल अशी अट ठेवली. परंतू, कोविड चाचणी केंद्रांची संख्या कमी असल्याने दुकानदार व कर्मचारी यांना चाचणी करून घेणे शक्य होत नाही आहे. यासाठी प्रशासनाने कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढवावी तसेच दुकाने सील करण्याची कारवाई थांबवावी,अशी मागणी माजी महापौर तथा काँग्रेस नेते मदन भरगड यांनी केली आहे.





शहरात 25 हजार दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात सरासरी 3 जण आहेत. म्हणजे 75 हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी १ महीना  लागतील. कारण आज रोजी शहरात चाचणी करण्यासाठी केवळ 10 केंद्र सुरू आहेत. प्रत्येक चाचणी केन्द्रा वर दररोज फक्त 200 ते 300 चाचणी होऊ शकते  त्यामुळे कोविड चाचणीसाठी शहरात केंद्रांची संख्या वाढवावी ,असे मदन भारगड यांनी म्हंटले आहे. 




जोपर्यंत कोव्हिड चाचणी केंद्र वाढविण्यात येत नाही, तोपर्यंत महापालिकेने दुकान सील करण्याची कारवाई थांबवावी, असे भरगड यांचे म्हणणे आहे.

टिप्पण्या