Coronavirus:Maharashtra: राज्यात कोरोना रुग्ण संख्या एकदम घटली; चाचणी प्रमाण कमी की सार्वजनिक सुट्टीचा परिणाम!




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चिंता व्यक्त होत आहे. पुन्हा lockdown ची परिस्थिती उदभवली आहे. मात्र, गेल्या 24 तासातील आकडेवारी पाहता दिलासादायक चित्र आहे. परंतू एकदम एका दिवसात एवढी नवे रुग्ण संख्या कशी काय घटली, याबाबत आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना चाचणी कमी झाल्यात की रंगपंचमी धुळवड निमित्त असलेली सार्वजनिक सुटी याला कारणीभूत आहे? की सरकारी सुटी मुळे कोरोना पण सुटीवर गेला,असे मिश्किलपणे सामान्य नागरिकांना मध्ये चर्चा होताना बोलले गेले.




राज्याची स्थिती


राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 928 रुग्ण आढळले आहेत. तर 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 23 हजार 820 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 23 लाख 77 हजार 127 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.96 % एवढा आहे.सध्या राज्यात 16 लाख 56 हजार 697 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर 17 हजार 649 व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 एक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत 4 हजार 760 रुग्ण आढळले आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 3287 रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात 40 हजार रुग्ण आढळून आले होते. पण सोमवारी ही संख्या तब्बल 9 हजारांनी कमी झाली तर मंगळवारी आणखी कमी होऊन ही संख्या 27 हजारांवर आली आहे.





*New Cases - 27,918

*Recoveries - 23,820

*Deaths - 139

*Active Cases - 3,40,542

*Total Cases till date - 27,73,436

*Total Recoveries till date - 23,77,127

*Total Deaths till date - 54,422





अकोल्याची स्थिती


आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 230 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 181 अहवाल निगेटीव्ह तर 49  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 414  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 55  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 27444(22375+4892+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 154477 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 151868,  फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2230  नमुने होते. आजपर्यंत एकूण 154100 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 131725 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 



49 पॉझिटिव्ह


आज दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी ४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी येथील चार, मुर्तिजापूर, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी तीन, शास्त्री  नगर, मलकापूर, कौलखेड, रणपिसे नगर, महान, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित वाडेगाव, रामधन प्लॉट, हिंगणा रोड, उगवा, डाबकी रोड, सहकार नगर, खडकी, तुकाराम चौक, आदर्श कॉलनी, जीएमसी, गिता नगर, शेलू बोंडे, रुद्रायणी, पातूर, पत्रकार कॉलनी, तेल्हारा, बेलूरा, रामदासपेठ, वाशिम बायपास, कॉग्रेस नगर, हिवरा व निंबा येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.




काल(दि.29) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.  दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी  प्राप्त अहवालात 49, सायंकाळी प्राप्त अहवालात निरंक तर रॅपिड चाचण्यात 55 असे एकूण 104 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.




चार जणांचे मृत्यू


दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात वाशिम बायपास, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात रामदासपेठ, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य मनोरथ कॉलनी डाबकी रोड, अकोला येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील २७ वर्षीय महिला असून या महिलेस दि. ३० रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.




414 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७०, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, उम्मत हॉस्पीटल सोनोरी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील एक, हारमोनी हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन हॉस्पीटल येथील नऊ, ओझोन हॉस्पीटल येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालयातून सहा, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, इंद्रा हॉस्पीटल येथील  दोन, तर होम आयसोलेशन येथील २८६ जणांना असे एकूण ४१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.




6319 जणांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 27444(22375+4892+177) आहे. त्यातील 451 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 20674 आहे. तर सद्यस्थितीत 6319 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे



टिप्पण्या