- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: भारतीय जैन संघटना (बीजेएस) सामाजिक कार्य कौतुकास्पद असून, सर्व जिल्ह्यात सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत चांगले काम झाल्याचे दिसून येत आहे, असे मत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार यांनी मंगळवार 23 मार्च रोजी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात एक विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री दत्तात्रेय भरणे,भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, वित्त, नियोजन आणि जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचेसह कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले या बैठकीत सहभागी झाले होते. अकोला, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, बीड आणि जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीत व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, रोहयोचे उपजिल्हाधिकारी आणि सुजलाम सुफलामचे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे आणि भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षातून सहभागी झाले होते. कृषी सचिव एकनाथ डवले यांनी बैठकीत प्रास्ताविक केले. शांतीलाल मुथ्था यांनी सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात केलेल्या जलसंधारण कामांची आणि शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला जिल्ह्यात सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आणि ग्रामपंचायतीकडून भारतीय जैन संघटनेच्या मशिनची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगितले.
पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन
बीजेएस च्या सामाजिक कार्याचे कौतुक करून सर्व जिल्ह्यात सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत चांगले काम झाल्याचे दिसून येत आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बीजेएसच्या कामांमुळे शासनाला चांगली मदत होत अशी भावना व्यक्त करून या कामांसाठी आवश्यक असलेल्या डिझेलसाठी निधीची उपलब्धता जिल्हा स्तरावर करून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा