BJP AKOLA: MPSC परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळते आहे - भाजयुमो




भारतीय अलंकार 24

अकोला:  14 मार्च ला होऊ घातलेली राज्यातील MPSC ची नियोजित परीक्षा वेळेवर रद्द करण्याचा निर्णय राज्यसरकार ने घेतला असून हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत नियोजीत परीक्षा ठरलेल्या वेळेत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये अश्या मागणी चे पत्र आज भाजयुमो अकोला तर्फे राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे.



राज्यात सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात पण या सरकार ला त्रास मात्र फक्त परीक्षा मुळे च होत असल्याचे वेळो वेळी दिसून आले आहे.आता पर्यंत पाच वेळा MPSC ची परीक्षा या सरकारने रद्द केली असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार या महाभकास आघाडी सरकार ठेवली आहे.आज पुण्यात या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर या राज्य सरकारने लाठीचार्ज केला आहे हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतो पण आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या सामान्य घरातील विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या या भकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध,राज्यातील विद्यार्थी,शेतकरी,वीज बिलामुळे  सामान्य नागरी हे सगळेच अडचणीत या गोंधळलेल्या सरकारच्या कार्यकाळात आले आहे.मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे शासकीय पदभरती मध्ये निवड होऊन सुद्धा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी पदभरती पासून वंचित राहिले आहे.रखडलेल्या शासकीय पदभरती मध्ये मराठा समाजा संदर्भात सकारात्मक विचार करून शासनाने  मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन यामध्ये तरतूद करण्यात यावी अशीही मागणी भाजयुमो ने केली आहे.



महाराष्ट्रातील अठरापगड जाती बारा बलुतेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने योग्य तो बसून निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजा सहित इतर समाजावर अन्याय होणार नाही यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या राजकीय कला कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली यावेळी भाजयुमो ने केली आहे.



भाजपाचे आमदार गोपीचंद पडवळकर यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन सुरू आहे नागपूर कोल्हापूर सोलापूर या भागात सुद्धा विद्यार्थी संतापले आहेत.राज्यात सर्वत्र आज या निर्णयाविरोधात आंदोलन होत असताना या सरकार मधील तिन्ही घटक पक्ष मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत पुन्हा फक्त आपला राजकीय स्वार्थ साध्य करू पाहत आहे या सरकारचा निषेध करावा तितके कमी आहे.



केंद्रीय शिक्षणमंत्री ना.रमेश पोखरियाल निशंक जी आणि केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात JEE ची परीक्षा योग्य नियोजन पार पडल्या. विद्यापीठांच्या परीक्षा सुद्धा योग्य नियोजनात झाल्या फक्त MPSC च्या परीक्षेत कोरोनाचे कारण सांगून स्थगितीचा निर्णय घेणाऱ्या या भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध भाजयुमो तर्फे करण्यात आला.



भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर,अकोला पश्चिम चे आमदार व जेष्ठ नेते गोवर्धन शर्मा, मूर्तिजापूरचे आमदार हरीश  पिंपळे, अकोट आमदार प्रकाश भारसाकळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,महापौर अर्चना  मसने यांच्या मार्गदर्शनात परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजयुमो तर्फे निषेध करत परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अश्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री याना निवेदन पाठवण्यात आले.



यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर, जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, किरण अवताडे पाटील, प्रवीण डिक्कर, महानगर सरचिटणीस निलेश काकड, अभिजित बांगर, उज्वल बामणे,जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा ऍड रुपाली राऊत, अक्षय जोशी, केशव हेडा, भूषण इंदोरिया, रितेश जामनेर, टोनी जयराज, वैभव मेहेरे, अभिषेक भगत व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या