Bharat e market: महाशिवरात्रीला वेन्डर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन भारत ई मार्केट बाजारात; स्थानिक उत्पादनाला चालना, ग्राहकांना मिळणार स्वस्त दरात वस्तू

                                      file image



भारतीय अलंकार 24

नवी दिल्ली: कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने काल गुरुवारी महाशिवरात्री निमित्त वेन्डर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन भारत ई मार्केट बाजारात आणला आहे. आता ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी भारतीयांना ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. सुमारे 8 कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAIT ने दिल्लीत वेन्डर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन Bharat e Market बाजारात आणला आहे. हे पूर्णपणे घरगुती (भारतीय) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. 



कॅटने म्हंटले आहे की,' Bharat e Market संपूर्णपणे पारदर्शक आणि जबाबदार व्यापार सिस्टीमच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञान, चांगली डिलिव्हरी, इनोव्हेटिव्ह मार्केटिंग, कार्यक्षम डिजिटल पेमेंटसह तयार केले गेले आहे. ही स्पर्धा केवळ भारताशीच नाही तर जगातील कोणत्याही ई-कॉमर्स पोर्टल सोबत होईल.


CAIT चा दावा आहे की,'Bharat e Market स्वस्त दरात वस्तू आणि सेवा देईल, जे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.'


देशातील विविध राज्यातील मोठे व्यापारी या पोर्टलवर आपली सेवा देण्यास सज्ज आहेत. ई-कॉमर्स पोर्टल भारत ई-मार्केट सुरू करण्याच्या पहिल्या टप्प्यात व्यापारी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारे या पोर्टलवर स्वतःचे 'ई दुकान' तयार करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप सुरू करण्यात आले. 




या प्रसंगी कॅटच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांतील मोठे व्यापारी नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे व्यवसायाशी संबंधित इतर विभाग होते. विशेषत: वाहतूक, शेतकरी, लघु उद्योग, महिला उद्योजक, स्वयं उद्योजक, फेरीवाले आणि ग्राहकांच्या बर्‍याच राष्ट्रीय संघटना यांचे नेतेही यात सामील झाले.


स्थानिक उत्पादनाला चालना मिळेल

                            image : C A I T 

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, 'गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 'लोकल पर वोकल आणि आत्मनिर्भर भारत' चे आवाहन केले होते, ज्यात भारतीय वस्तू आणि तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात आला होता. कॅटने या मोहिमेअंतर्गत भारत ई-मार्केट पोर्टल सुरू करण्याची योजना आखली आहे, ज्याद्वारे भारतीय वस्तूंचे उत्पादक आणि व्यापारी या पोर्टलवर स्वतःचे ई-दुकान उघडून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतात. या पोर्टलवर मर्चंट-टू-मर्चंट (B2B) आणि मर्चंट-टू-कन्झ्युमर (B2C) व्यवसाय अगदी सहज करता येतो.'



Bharat e Market ची वैशिष्ट्य

                                    file image


या पोर्टलवर, मर्चंट टू मर्चंट (B2B) आणि मर्चंट टू कंझ्युमर (B2C) त्यांचा माल विकू शकतो आणि खरेदी करू शकतील.


या पोर्टलवर 'ई-दुकान' उघडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पहिले मोबाइल अ‍ॅपद्वारे स्वत: ची नोंदणी केली पाहिजे.


रेकॉर्ड केलेली माहिती परदेशात जाणार नाही, कारण हे पूर्णपणे डोमेस्टिक अ‍ॅप आहे, म्हणून सर्व डेटा देशातच राहील आणि जो कुठेही विकला जाणार नाही.


या प्लॅटफॉर्म साठी कोणताही परकीय निधी स्वीकारला जाणार नाही.


या पोर्टलवर कोणताही विक्रेता चिनी वस्तूंची विक्री करणार नाही.


स्थानिक कारागीर, कामगार आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या इतर वस्तूंचे व्यापारी, लहान कारागीर आणि व्यापारी यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


या पोर्टलवर बिझनेस करण्यासाठी कोणतेही कमिशन शुल्क आकारले जाणार नाही.




आदी मुद्दे कॅटने स्पष्ट केले आहेत.

टिप्पण्या