- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विविध क्षेत्रातील सतरा तरुणांचा कार्यकारिणीत समावेश
भारतीय अलंकार24
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार तसेच विविध सामाजिक कार्य करण्यासाठी राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या वतीने राष्ट्रधर्म युवा मंच स्थापन करण्यात आले आहे या मंचाच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी फुले, शाहू, आंबेडकर विचारवंत अंकुश मानकर यांची निवड करण्यात आली असून, सचिवपदाची जबाबदारी पत्रकार शुभम बायस्कार यांना बहाल करण्यात आली आहे. तर तिघांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे.
राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज आश्रम मोझरी संचालित राष्ट्रधर्म युवा मंचाची स्थापना महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. सदर युवा मंचाच्या वतीने राष्ट्रीय, सामाजिक कार्य, विविध स्थळी सुसंस्कार शिबिर, श्रमदान कार्यक्रम आरोग्य शिबिर यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येते. एकंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा तेवत ठेवत नव्या पिढीला हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून केले जातो. याच करमत आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा युवा मंच याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अध्यक्षपदी अंकुश मानकर यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी पत्रकार शुभम बायस्कार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदाची जबाबदारी अक्षय भोपळे, निलेश मोहोकार, शुभम झाडे यांना देण्यात आली. तसेच सहसचिव म्हणून वैभव रौराळे, प्रवक्ता सुबोध धुरंधर, आशिष कांबळे, कोषाध्यक्ष आकाश उगले, प्रसिद्धीप्रमुख रोहित गावंडे, प्रज्वल लांडे, संपर्कप्रमुख प्रसाद बरगट, जिल्हा संघटक हनमंत ठाकरे, शहर संघटक विजय माथने, सदस्य युवराज लढाऊ, अभिषेक भेंडारकर, योगेश गावंडे, बंडू लांडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, चोरोडे गुरुजी, डॉ.विघे गुरुजी, कठोळे महाराज, नामदेव गव्हाळे महाराज, केंद्रीय समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र तराळे, सचिव मनीष देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानेच युवा मंचचे पदाधिकारी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख रोहित गावंडे प्रज्वल लांडे यांनी दिली.
टिप्पण्या
शुभम दादा छान ,माहिती देत आहे,शुभेच्छा, जयगुरू
उत्तर द्याहटवा