Akola Crime: हत्याकांड गुन्ह्यातील जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा धुमाकूळ; आरोपीची परत कारागृहात रवानगी


 

भारतीय अलंकार 24

अकोला: सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पुंडलिक बाबा आश्रम परिसर मागील बाजूला एका अपार्टमेंट मध्ये गाडी बाजूला काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून युवक व त्याच्या साथीदारांनी चांगलाच गोंधळ घातला असून, तेथील अंदाजे १७ वर्षीय युवतीच्या अंगावर चाकू घेऊन धावून आला. युवतीच्या आईने युवकाला अडविल्याने मोठा अनर्थ टळला.  गोंधळ घालणारा युवक हा अंकुश सपकाळ असून हत्या प्रकरणातील आरोपी आहे. हा आरोपी काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटून आला असल्याची माहिती आहे. 




सविस्तर वृत्त असे की , सिव्हिल लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पुंडलिक बाबा आश्रम शेजारील परिसरात सोमवारी दुपारी काही युवकांनी गाडी बाजूला काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून युवतीशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. अन अंकुश सपकाळ नामक युवक त्या युवतीच्या अंगावर स्वतः जवळ असलेले शस्त्र घेऊन युवतीच्या अंगावर धावून गेला. या युवतीची आई मधात आल्याने मोठा अनर्थ टळला. 




त्यानंतर हा युवक हे एवढ्यावरच थांबला नाही. त्याने युवतीच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला. याप्रकरणी या युवतीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. परंतू सुरुवातीला एवढ्या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात सिव्हिल लाईन पोलीस टाळत  होते. नंतर मात्र या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा फोन येताच त्या युवका विरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हे दाखल केले. 




मंगळवारी या प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती आहे.  तर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अंकुश ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा पुंडलिक बाबा आश्रम परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या