- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola city crime : मच्छी मार्केट मध्ये दोन विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी;दोघेही पोलिसांच्या ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: शहरात मध्यभागी असलेल्या मच्छी मार्केटमध्ये मासळी विक्रीसाठी दुकान लावण्याच्या कारणा वरून दोन विक्रेत्यांमध्ये आज तुफान हाणामारी झाली.
या बाजारात मच्छी व्यवसायिक रस्त्याच्या कडेला दुकान मांडतात. मात्र, आज दुकान मांडण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्याने जवळच असलेल्या ताजनापेठ पोलीस चौकीतील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, या मच्छि व्यवसायिकांनी पोलिसांच्या समोरच एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करणे सुरूच ठेवले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या विक्रेत्यांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा