High court: अखेर तब्बल १८ वर्षानंतर डीएमएलटी धारकांना मिळाला न्याय; आयएमएने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

                                      file image



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  मुंबई उच्च न्यायालयात सन २००२ मध्ये आय.एम.ए.नागपुरच्या पँथॉलॉजिस्ट द्वारे दाखल याचिका (क्रमांक १७७३/२००२) नागपुर खंडपीठाने फेटाळुन लावली आहे. या निकालामुळे तब्बल १८ वर्षानंतर डी एम एल टी धारकांना न्याय मिळाला आहे.



राज्य सरकारचे महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई (MSBTE) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली (AICTE) द्वारा मान्यता प्राप्त तीन वर्षीय डी एम एल टी पदविका अर्हता प्राप्त लेबॉरेटरी धारकांना लेबॉरेटरी टाकण्याचा अधिकार नाही, अशा संबंधाची पँथॉलॉजिस्ट नागपुर यांनी याचिका दाखल केली होती. परंतू, राज्य सरकारने तीन वर्ष अभ्यासक्रमाचा हेतु व उद्देश स्वयंरोजगार करिता होता, महाराष्ट्र राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता राज्यातील ७० ते ८० टक्के तालुक्यात पँथॉलॉजिस्ट नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवा अबाधित रहावी तसेच रक्त, लघवी, थुंकी तपासण्याची सुविधा महाराष्ट्रातील तळागाळात व दुर्गम भागात व्हावी, याच हेतुने राज्य सरकारने हा अभ्यासक्रम सुरु केला होता. 



परामेडीकल अर्हता प्राप्त व्यक्तिच्या नोंदणी करिता महाराष्ट्र परावैद्यक अधिनियम २०११ व महाराष्ट्र परामेडीकल कॉन्सिल अधिनियम २०१७ राज्य सरकारचे विधिमंडळाने मंजुर करुन त्यावर प्रथम राज्यपाल  व नंतर  राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर कायद्याचे स्वरुप प्राप्त झाले. एवढे सगळे डी एम एल टी लेबॉरेटरी धारकांच्या बाजुने असुनही पँथॉलॉजिस्टची काही मंडळी समाजात भ्रम पसरवुन डी एम एल टी धारकांना लेबॉरेटरी चालविण्याचा अधिकार नाही व याबाबत बऱ्याच वर्तमान पत्रात बदनामी कारक बातम्या देत होते. सन २००२ पासुन नागपुर खंडपिठात सुरु असलेल्या याचिका वर अनेकदा सुनावणी झाल्या. मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन नागपुर यांच्या अथक परिश्रमाने या संबंधित कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यात आला होता. सर्व कागदपत्रांची तपासणी करुन याचिका कर्ता व गैर याचिका कर्ता यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकुन घेतले व आय एम ए नागपुरच्या पँथॉलॉजिस्टने दाखल केलेली याचिका नागपुर खंडपिठाने २८ जानेवारी २०२१ रोजी फेटाळुन लावली. मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन नागपुरच्या सर्व पदाधिकारी यांनी या याचिकामुळे खुप परिश्रम घेवुन महाराष्ट्रातील तळागाळात आरोग्य सेवा देणाऱ्या डी एम एल टी लेबॉरेटरी धारकांना कायदेशीर न्याय मिळवुन दिला आहे.


नागपुर खंडपिठाच्या निर्णया नंतर मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएनचे पदाधिकारी जल्लोष करतांना




"नागपुर खंडपिठाच्या निकालामुळे महाराष्ट्रातील तमाम सरकार मान्य डी एम एल टी धारकांना न्याय मिळाला. या करिता जे अथक परिश्रम मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशनच्या  सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतले त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे." 


रवि गजानन येवले पाटील

सचिव मेडीकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन अकोला जिल्हा

...



टिप्पण्या

  1. अखेर न्याय मिळाला सर्व प्रयत्न करणारांचे आभार व सर्व MSBTE DMLT अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा