Election2021 ABA: अध्यक्षपदाची एकतर्फी लढत विजय जाधव यांनी जिंकली; सहसचिव पदाच्या काट्याच्या लढतीत धीरज शुक्ला यांनी मारली बाजी

*उपाध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत अनुप देशमुख आणि संगिता भाकरे विजयी


*सहसचिव पदाच्या काट्याच्या लढतीत धीरज शुक्ला यांनी मारली बाजी



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  प्रतिष्ठतेची समजल्या जाणारी अकोला बार असोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक २०२१ आज शुक्रवारी पार पडली. अध्यक्षपदी ॲड. विजयकुमार (राजेश) जाधव यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये जाधव यांनी ॲड.विजय गोएनका यांचा तब्बल ४२२ मतांची आघाडी घेत पराभव केला. जाधव यांनी ७१३ तर गोएनका यांनी २९१ मत प्राप्त केले. ६ मत अवैध ठरली.


उपाध्यक्षपदी अनुप देशमुख


उपाध्यक्ष पदासाठी ॲड.सुमित बजाज आणि ॲड. अनुप देशमुख यांच्यात चुरस झाली.यामध्ये १९० मतांची आघाडी घेत देशमुख यांनी विजय मिळविला.देशमुख यांना ५९७ मत मिळाली. बजाज यांनी ४०७ मत प्राप्त केली. ६ मत अवैध ठरली.


महिला उपाध्यक्षपदी संगिता भाकरे


महिला उपाध्यक्ष पदाची लढत अटीतटीची झाली.ॲड. संगिता भाकरे आणि ॲड. सुनीता कपिले यांच्यातील या लढतीमध्ये भाकरे यांनी ४२ मतांची आघाडी घेत निवडणूक जिंकली. भाकरे यांनी ५२२ तर कपिले यांनी ४७९ मत प्राप्त केली. १० मत अवैध ठरली.


सहसचिवपदी धीरज शुक्ला

सहसचिवपदाची लढत काट्याची झाली. या लढतीमध्ये ॲड. जयेशकुमार गावंडे, ॲड.धीरज शुक्ला,ॲड.राहुल वानखडे रिंगणात होते. धीरज शुक्ला आणि राहुल वानखडे यांच्यात चुरस झाली. अवघ्या ७ मताची आघाडी घेत धीरज शुक्ला यांनी विजय मिळविला. गावंडे यांनी १६८ मत मिळविली. शुक्ला यांनी ४२२ मत मिळविली. तर वानखडे यांनी ४१५ मत प्राप्त केली. ५ मत अवैध ठरली.




या निवडणुकीत ११९७ वकीलांनी  मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.उदय नाईक यांनी काम पाहिले.त्यांना ॲड. गणेश पाठक, ॲड. रविकांत ठाकरे तसेच ॲड. सत्यनारायण जोशी, ॲड.राजेश अकोटकर, रवि श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले.



विजयी मिरवणूक

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अकोला जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात जल्लोष करण्यात आला. मिठाई वाटून आणि आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.विजयी उमेदवारांची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.बँड बाज्याच्या तालावर विजयी उमेदवारांच्या पाठीराख्यानी ठेका धरला होता. 


नवनिर्वाचितांचे स्वागत

अकोला बार असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. मावळते अध्यक्ष ॲड.आनंद गोदे  ॲड जाधव यांचे स्वागत करून पदभार सोपविला. ॲड.भारती रुंगटा, ॲड. प्रवीण राठी,ॲड.सुहास राजदेरकर यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले. ॲड.गोदे यांनी मागीलवर्षीचा लेखाजोखा मांडला. निवडून आलेल्या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करून नवे संकल्प जाहीर केले. 




LIST OF CONTESTING CANDIDATES


FOR THE POST OF PRESIDENT


1 GOENKA VIJAY (V-291)


2) JADHAV VIJAY (V-713)


FOR THE POST OF VICE PRESIDENT


1) BAJAJ SUMEET (V-407)


2) DESHMUKH ANUP (V-597)




FOR THE POST OF LADY VICE PRESIDENT


1) BHAKARE SANGITA (V-522) 


2] KAPILE SUNITA (V-479)


FOR THE POST OF JT SECRETARY


1) GAWANDE JAYESH (V-168)


2) SHUKLA DHEERAJ (V-422)


3) WANKHADE RAHUL (V-415)


ELECTION OFFICER AKOLA BAR ASSOCIATION,


AKOLA

टिप्पण्या

  1. *आमचे परममित्र , मार्गदर्शक, ॲड राजेश जाधव हे अकोला वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन*

    🌹🌹💐💐🌹🌹
    💐💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा