Crime news: विना परवाना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल; मूर्तिजापूर येथील घटना, डॉ चावकेला मिळाला जामीन

                                      File photo

Criminal charges against a doctor treating unlicensed Corona patients;  Incident at Murtijapur




भारतीय अलंकार24

अकोला : मूर्तिजापूर येथील डॉ.पुरुषोत्तम चावके विरुद्ध अखेर आज फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. डॉ चावके करोना रुग्णांवर विना परवानगी उपचार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाने डॉ.चावके यांच्या रुग्णालयाची आज तपासणी केली असता, यात डॉक्टर दोषी आढल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 



कोविड रुग्णांवर उपचार करण्याची मान्यता नसतानाही उपचार करणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम चावके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज शुक्रवारला अकोला व मुंबई शासकीय पथकाने डॉ चावकेच्या रुग्णालयात आकस्मिक भेट दिली. तेव्हा परवाना नसताना दोन कोरोना बाधिताना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले.



पुरुषोत्त्म चावके  BAMS असून, कोविड  काळात गेल्या वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहे. मागील वर्षी गडगंज माया जमवून त्याने केळकर वाडी स्थित संतकृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटर सुरु केले. त्याच्या विरुद्ध मागील वर्षी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रार व माहिती वरून पुरूषोत्तम चावके याच्यावर अकोला व मुंबई विभाग शासकीय पथकाने आकस्मिक भेट दिली. तेव्हा कोरोना रुग्णांवर उपचार करतांना आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार डॉ. चावके जवळ कुठलाही परवाना नाही.



३१ वर्षीय डॉ.पुरूषोत्तम चावके याच्याकडे कोरोना रुग्णांना भरती करवून, त्यांच्यावर उपचार करण्याचा कुठलाही परवाना आढळला नाही. प्रशिक्षण व परवाना अभावी कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असतांनाही आर्थिक फायद्यासाठी कोरोना रुग्णांना आंतररूग्ण म्हणून दाखल करवून घेतले. या प्रकरणी डॉ.पुरुषोत्तम चावके विरुद्ध भादंविच्या १८८, २६९, २७०,३३६, ४२० नुसार मुर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



आरोपीला जामीन

दरम्यान, डॉ चावके याने मूर्तिजापूर न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. सरकारी वकिलांनी जोरदार विरोध करीत, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून,आरोपीस जामीनावर सोडल्यास तो अश्या प्रकारचे गुन्हे करीत राहील,असा युक्तिवाद केला. तर आरोपीच्या वकिलांनी सांगितले की,या गुन्ह्यात डॉक्टरला फसविण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी डॉ चावकेला सशर्त जामीन मंजूर केला.


टिप्पण्या